IPL Auction 2025 Who is The Youngest Player Vaibhav Suryavanshi: आयपीएल २०२५ च्या महालिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएल लिलावासाठी नाव नोंदणी केलेल्या ११६५ खेळाडूंपैकी ५७४ खेळाडूंची लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. या लिलावात अनेक वयस्कर आणि युवा खेळाडू आहेत. लिलावासाठी निवडलेल्या ५७४ खेळाडूंमध्ये एका १३ वर्षीय क्रिकेटपटूचाही समावेश आहे.

कोण आहे १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी? (Who is Vaibhav Suryavanshi)

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने जाहीर केलेल्या लिलावाच्या यादीत ३६६ भारतीय आणि २०८ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी एक नाव आहे बिहारच्या समस्तीपूर येथील वैभव सूर्यवंशीचे. वैभव सूर्यवंशी अजूनही केवळ १३ वर्षांचा आहे. या तरुण वयात त्याने रणजी करंडक, हेमंत करंडक, कूचबिहार करंडक आणि विनू मांकड ट्रॉफी खेळली आहे. अलीकडेच त्याची भारतीय अंडर-१९ संघातही निवड झाली होती.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
North Nagpur, Atul Khobragade, Employee Pension,
या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीसाठी अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली एक महिन्याची पेन्शन
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?

हेही वाचा – IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या योग्य चॅनेल

वैभव सूर्यवंशीने वयाच्या पाचव्या वर्षी क्रिकेट शिकण्यास सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, त्याचे वडील संजीव यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून वैभवला नेट प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. त्यासाठी वडिलांनी घरी जाळी बसवली होती. रणजी ट्रॉफीच्या गेल्या मोसमात वैभवला बिहारकडून पदार्पणाची संधी मिळाली. वैभवने अवघे १२ वर्षे आणि २८४ दिवस वय असताना पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. त्याच वर्षी, वैभव सूर्यवंशीने बिहार क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या रणधीर वर्मा अंडर-१९ वनडे स्पर्धेत त्रिशतकही झळकावले होते. अंडर-१९ स्पर्धेच्या इतिहासातील हे पहिले त्रिशतकही ठरले.

हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

Vaibhav Suryavanshi Youngest Player in IPL 2025 Auction
वैभव सूर्यवंशी १३ वर्षीय खेळाडू आयपीएल लिलावात उतरणार

आयपीएल लिलावासाठी निवडलेल्या खेळाडूंच्या यादीत डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशी ४९१व्या क्रमांकावर आहे. अनकॅप्ड खेळाडूंच्या (UBA9) श्रेणीत त्याचा समावेश आहे. ज्यामध्ये त्याचे नाव ६८व्या सेटच्या खेळाडूंमध्ये आहे. त्याने या वर्षी जानेवारी २०२४ मध्ये बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर सूर्यवंशीने भारत अंडर-१९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर -१९ युवा कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते, जिथे पहिल्याच सामन्यात वैभवने धमाकेदार शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा – KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य

वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६४ चेंडूंचा सामना करत १०४ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने अवघ्या ५८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या स्फोटक खेळीत त्याने १४चौकार आणि ४ षटकार लगावले होते. यासह तो अंडर-१९ कसोटीत सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज बनला.

आगामी अंडर १९ आशिया चषक स्पर्धेसाठी वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. या महिन्याच्या अखेरीस ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारतीय संघ ३० नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध अंडर १९आशिया चषकातील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.