Harbhajan Singh and S Sreesanth: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट प्रीमियर लीग आयपीएलला १५ वर्षे पूर्ण झाली असून त्याचा १६वा हंगाम अजूनही सुरू आहे. या स्पर्धेच्या इतिहासात अनेक महान क्षण पाहायला मिळाले जे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतील. या क्षणांव्यतिरिक्त, लीग देखील वाद आणि खेळाडूंच्या मारामारीपासून दूर गेलेली नाही. या ऐतिहासिक लीगच्या पहिल्याच हंगामात (२००८) मोठा वाद झाला होता, ज्याची आजही चर्चा आहे. मोहालीत खेळल्या जात असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने किंग्ज इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतला वादानंतर मैदानातच थप्पड मारली. यानंतर श्रीशांत मैदानात रडताना दिसला आणि या प्रकरणाने त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरभजन आणि श्रीशांत एकाच मंचावर एकत्र दिसले

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि वेगवान गोलंदाज श्रीशांत हे वाद विसरून चांगले मित्र बनले आहेत. पण तरीही या घटनेची चर्चा सुरूच आहे. विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या ऐतिहासिक विजयाचा १२वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी दोन्ही खेळाडू नुकतेच एकाच मंचावर सामायिक समालोचन करताना दिसले. हरभजन, श्रीशांतसह युसूफ पठाण आणि वीरेंद्र सेहवाग हे स्टार स्पोर्ट्सने निर्मित केलेल्या विशेष भागाचा भाग होते.

या चर्चेदरम्यान श्रीशांत हरभजन सिंगची जोरदार स्तुती करत होता आणि भज्जीचे त्याच्या करिअरमधील महत्त्व सांगत होता. दरम्यान, अचानक वीरेंद्र सेहवागने त्याला मोहालीतील वादाची आठवण करून दिली, ज्यावर हरभजनने लगेच प्रत्युत्तर देत त्याला विसरण्याची विनंती केली. विषय तिथेच थांबव असं म्हणत तो म्हणाला की, “विसरून जाऊ आपण सगळे त्या घटनेला आणि पुढे खूप मोठे आयुष्य आहे.” असे म्हणत त्याने यावर मत मांडले.

हेही वाचा: DC Vs GT: “एवढ्या लवकर मत तयार करायला…”, पृथ्वी शॉ, सरफराजबाबत मेंटॉर सौरव गांगुलीने केले सूचक विधान

वीरेंद्र सेहवागने पुन्हा वादाची आठवण करून दिली, हरभजन थांबला

वास्तविक चर्चेदरम्यान श्रीशांत म्हणाला, “मला सांगायचे आहे की कसोटी किंवा इतर कोणताही सामना खेळण्यापूर्वी मी नेहमी भज्जी पा (हरभजन सिंग)ला मिठी मारत असे. माझी कामगिरी नेहमीच चांगली होती.” यानंतर, श्रीशांत काही बोलण्यापूर्वी, सेहवागने मध्येच थांबवलं, “हा मिठीचा ट्रेंड कधीपासून सुरू झाला? मोहालीतील घटनेनंतर कदाचित. यावर हरभजनने लगेचच ‘यार विसरा’ असे त्याने उत्तर दिले.”

आम्ही नेहमीच चांगले मित्र होतो आणि आहोत – श्रीशांत

याआधीही श्रीशांतने या प्रकरणावर बोलताना हरभजनचे कौतुक केले आहे. याबाबत त्यांनी नुकतेच सांगितले होते की, “आम्ही नेहमीच चांगले मित्र आहोत आणि याआधीही होतो, जे काही घडले ते काही गैरसमजामुळे झाले आणि मीडियाने ते प्रकरण लावून धरले. मला असे म्हणायचे आहे की भज्जी पा यांनी माझ्या सुरुवातीपासून मला प्रत्येक प्रकारे मदत केली आहे आणि अगदी अलीकडे समालोचनातही काही टिप्स दिल्या आहेत. त्यांनी मला पाठिंबा दिला आणि मदत केली, त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी आहे. ते एक गाणं आहे ना, ‘तेरे जैसा यार कहाँ’, माझं त्याच्याशी असंच त्या गाण्याप्रमाणे नातं आहे.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl bhai ise bhul javo yar sehwag was reminding sreesanth of the brawl in mohali harbhajan interrupted watch video avw