आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होते आहे. अबु धाबीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. २०१९ साली झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईवर मात केली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामाची सुरुवातही या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याने होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल. हंगामातला पहिला सामना खेळण्याची मुंबई इंडियन्सची ही सातवी वेळ असणार आहे.
याआधी २००९, २०१२, २०१४, २०१५, २०१६ आणि २०१८ या सहा हंगामात मुंबई इंडियन्सने पहिला सामना खेळला होता. यापैकी २००९ साली मुंबई गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर, २०१२ साली तिसऱ्या स्थानावर तर २०१४ साली चौथ्या स्थानावर राहिले होते. २०१५ साली मुंबईने हंगामाचं विजेतेपद मिळवलं होतं. याव्यतिरीक्त २०१६ आणि २०१८ साली मुंबई इंडियन्स पाचव्या स्थानावर राहिलं होतं. त्यामुळे ज्यावेळी मुंबई इंडियन्स हंगामातला पहिला सामना खेळतं त्यावेळी त्यांची कामगिरी ही संमिश्र स्वरुपाची राहिलेली आहे.
यंदाची संपूर्ण स्पर्धा ही युएईत होत असल्यामुळे सर्व संघांना विजयाची समान संधी असल्याचं बोललं जातंय. अशा परिस्थिती गतविजेता मुंबई इंडियन्स संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – MI vs CSK : IPL मध्ये आतापर्यंतच्या लढतींमध्ये कोणचा संघ ठरला आहे वरचढ??