Rishabh Pant Sold for 27 Crore in IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत २७ कोटींच्या सर्वाधिक बोलीसह आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. अवघ्या काही मिनिटातच त्याने श्रेयस अय्यरचा महागडा खेळाडू ठरल्याचा विक्रम मोडीत काढला. श्रेयस अय्यर २६.७५ कोटींना लिलावात सोल्ड झाला होता. पण २० कोटींच्या बोलीनंतर लखनौ संघाने थेट ७ कोटींची बोली लावत पंतला आपल्या संघात सामील केले. बहुप्रतिक्षित अशा ऋषभ पंतवर आरसीबी, लखनौ सुपर जायंट्सने बोली लावण्यास सुरूवात केली होती. यानंतर सनरायझर्सचा संघ बोली लावण्याच्या शर्यतीत उतरला. त्यानंतर हैदराबादच्या संघाने माघार घेतली. पण लखनौचा संघ शेवटपर्यंत शर्यतीत होता.

हेही वाचा – Shreyas Iyer IPL 2025 Auction: २६.७५ कोटी! श्रेयस अय्यर ठरला आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू, पंजाब किंग्सने लावली तगडी बोली

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
in Mumbai 55 percent increase in price of affordable homes
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज

ऋषभ पंत ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

पंत २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि अल्पावधीतच त्याची किंमत १० कोटींच्या पुढे गेली होती. यादरम्यान हैदराबादही शर्यतीत सामील झाले, पण लखनौनेही हार मानली नाही. हैदराबादची मालक काव्या मारन आणि लखनौचे मालक संजय गोयंका यांनी पंतसाठी बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत १७ कोटींच्या पुढे गेली. हैदराबाद आणि लखनौ इथेच थांबले नाहीत आणि पंतवरील बोली वाढतच गेली. लखनौने पंतसाठी २०.७५ कोटी रुपयांची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली. मात्र, दिल्लीने आरटीएमचा वापर केला. यानंतर लखनौने पंतसाठी विक्रमी थेट २७ कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने हात मागे घेतला. अशाप्रकारे पंतला २७ कोटी रुपयांसह लखनऊने आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून संघात सामील केले.

हेही वाचा – IPL Mega Auction 2025 Live Updates : तीन भारतीय खेळाडूंवर संघांनी खर्च केले ७१.७५ कोटी रुपये, ऋषभ ठरला सर्वात महागडा खेळाडू

ऋषभ पंत ने २०१६ मध्ये आयपीएल मध्ये पदार्पण केले. ऋषभ पंतच्या आयपीएल कारकीर्दीत त्याने एक शतक आणि १८ अर्धशतकं झळकावली आहेत. पंतने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील १११ सामन्यांमध्ये १४८.९३ च्या स्ट्राईकरेटने ३२८४धावा केल्या आहेत. आयपीएल मधील त्याची सर्वोच्च धावसंख्या ही १२८ धावा आहे. तर पंत नेत्याच्या कारकीर्द २९६ चौकार आणि १५४ षटकार लगावले आहेत. ऋषभ हा आपल्या बेधडक आणि विस्फोटक खेळीसाठी ओळखला जातो त्याचबरोबर विकेटच्या मागे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असतानाही तो उत्कृष्ट कामगिरी करतो.

ऋषभ पंतच्या नावावर आयपीएल मध्ये दोन अनोखे विक्रम आहेत. ऋषभ पंत हा मधल्या फळीत फलंदाजी करणारा फलंदाज आहे. मधल्या फळी फलंदाजी करताना २०१८ च्या आयपीएल सीझनमध्ये सर्वाधिक ५७९ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर २०१८ च्या आयपीएल सीझनमध्ये ऋषभ पंत ने सर्वाधिक ३७ षटकारही लगावले होते. नॉन ओपनर म्हणून एखाद्या खेळाडूने आयपीएलमध्ये लगावलेले हे सर्वाधिक षटकार आहेत, त्याचा विक्रम आजवर कोणीही मोडू शकलेला नाही.

२०२२ मध्ये ऋषभ पंत रस्ते अपघातात जखमी झाला होता, यानंतर आयपीएल २०२३ मध्ये तो खेळताना दिसला नाही आणि त्यानंतर आयपीएल २०२४ मध्ये त्याने शानदार पुनरागमन केलं. आयपीएल मधून पुनरागमन करताना तो टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग ठरला आणि या सामन्यांमध्ये देखील त्याने संघासाठी मोठी भूमिका बजावली.

Story img Loader