IPL Mega Auction 2025 Updates : श्रेयस अय्यर आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याचबरोबर ऋषभ पंत सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. पंजाब किंग्स संघाने २५.७५ कोटींना आपली पर्स रिकामी करत अय्यरला संघात सामील केले. श्रेयसवर सुरूवातीला पूर्वीचा संघ कोलकाता नाईट रायडर्सनेच बोली लावण्यास सुरूवात केली. तर पंजाब किंग्सचा संघही बोली लावण्यासाठी उतरला. १० कोटींनंतर कोलकाता संघ थांबला पण शेवटपर्यंत दिल्ली आणि पंजाबमध्ये श्रेयस अय्यरसाठी बोली लावली जात होती. यानंतर २५.७५ कोटींचा टप्पा गाठताच श्रेयस अय्यर ऋषभ पंतच्या मागोमाग आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

मिचेल स्टार्क हा २४.७५ कोटींसाठी आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू होता. पंजाब किंग्सने आता हा रेकॉर्ड मोडत श्रेयस अय्यरला २६.७५ कोटींना आपल्या संघात सामील केले आहे. अय्यरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. तो मार्की सेट १ खेळाडूंचा भाग होता.

8.12 lakh tonnes of soybeans were procured at guaranteed prices 37 lakh sold privately
३८ लाख टन सोयाबीन कवडीमोल दरात
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Robbery at sister house to play online gambling in Pimpri Pune print news
पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Net Worth : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांकडे घर आणि कारही नाही… अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केली संपत्ती
Image Of Adani Power
Adani Power चे शेअर्स दोन दिवसांत २७ टक्क्यांनी कशामुळे वाढले? कंपनीने सांगितले कारण
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
adani group stocks gains
Adani Group Shares: काल शेअर बाजार कोसळल्यानंतर आज अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; कारण काय?

हेही वाचा : IPL Mega Auction 2025 Live Updates : श्रेयस अय्यरनंतर ऋषभ पंत आयपीएलमध्ये इतिहास घडवण्यासाठी सज्ज

श्रेयसची IPL मधली आतापर्यंतची कामगिरी

२९ वर्षीय श्रेयस अय्यरने २०१५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून, अय्यरने आयपीएलमध्ये ११६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १२७ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ३१२७ धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये अय्यरची सर्वोच्च धावसंख्या ९६ धावा आहे. या मोठ्या स्पर्धेत त्याच्या बॅटने २१ अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली अय्यरने गेल्या वर्षी कोलकाताला १० वर्षांनंतर आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२४ चे जेतेपद पटकावले. तरीही कोलकत्ता संघाने श्रेयस अय्यरला आयपीएल २०२५ पूर्वी रिटेन्शनमध्ये रिलीज केले. लिलावापूर्वी श्रेयस अय्यरची बॅट चांगली तळताना दिसत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी सामन्यांमध्ये खेळताना श्रेयस अय्यरने शतकी कामगिरी केली. नंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० सामन्यामध्ये गोवा विरुद्ध खेळताना श्रेयसने उत्कृष्ट शतक झळकावले आणि त्याच्या शतकाच्या जोरावर मुंबई संघाला विजय मिळवण्यात यश आले.

हेही वाचा : KKR IPL 2025 Full Squad: श्रेयस अय्यरला रिलीज केल्यानंतर कसा असू शकतो केकेआरचा संघ, लिलावात कोणावर लावणार बोली?

श्रेयस अय्यरने टी-२० मध्ये आतापर्यंत ५७५९ धावा केल्या आहेत. यामध्ये ३६ अर्धशतकं आणि ३ शतकांचा समावेश आहे.

Story img Loader