IPL Mini Auction 2023 Highlights, Retained & Released Players List: आयपीएल २०२३ चा लिलाव कोचीन येथे संपन्न झाला आहे. यामध्ये ८७ स्लॉटसाठी ४०५ खेळाडू आपले नशीब आजमावले. १० संघांमधून सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याची लढाई होणार आहे. बेन स्टोक्स, सॅम करन, कॅमेरून ग्रीन, केन विलियम्सन आणि जो रूट यासारखे अनेक हाय-प्रोफाइल खेळाडू या वर्षी खेळाडूंच्या पूलमध्ये होते.आयपीएल मिनी लिलावाद्वारे संघटनांना त्यांच्या असोसिएशनमध्ये काही नवीन चेहरे जोडण्याची संधी मिळाली. इंडियन प्रीमिअर लीग २०२३च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी २३ डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल २०२३ मिनी लिलाव पार पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंवर या लिलावात मोठी रक्कम मिळाली.‌

इंग्लंडच्या सॅम करनने इतिहास रचला आहे. सॅम करनला पंजाब किंग्जने १८.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यासह सॅम कुरन आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. करनने मॉरिसचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्ससाठी १६.२५ कोटी रुपये दिले. लिलावाच्या सुरुवातीच्या सेटमध्ये इंग्लिश फलंदाज हॅरी ब्रूकही दिसला. ब्रूकला सनरायझर्स हैदराबादने १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. यासोबतच मयंक अग्रवाललाही लॉटरी लागली. सनरायझर्सने मयंकला ८.२५ कोटी रुपयांना जोडले आहे.

‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा हा सोलावा हंगाम असणार आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकली आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने चारवेळा हा चषक जिंकला. यंदाचा आयपीएल चषक कोणत्या संघाच्या झोळीत जाणार हे पाहण्यासारखा असेल. रॉयल चॅलेंजर बंगलोर अजूनही त्यांचा पहिला वहिला चषक मिळवण्याची वाट बघत आहे.

यंदाच्या पर्वातील टॉप महागडे खेळाडू

पंजाब किंग्स – सॅम कुरन ( १८.५० कोटी) मुंबई इंडियन्स – कॅमेरून ग्रीन ( १७.५० कोटी) चेन्नई सुपर किंग्स – बेन स्टोक्स ( १६.२५ कोटी) लखनौ सुपर जायंट्स – निकोलस पूरन ( १६ कोटी) सनरायझर्स हैदराबाद- हॅरी ब्रूक ( १३.२५ कोटी) सनरायझर्स हैदराबाद- मयांक अग्रवाल ( ८.२५ कोटी) गुजरात टायटन्स – शिवम मावी ( ६ कोटी) राजस्थान रॉयल्स – जेसन होल्डर ( ५.७५ कोटी) दिल्ली कॅपिटल्स – मुकेश कुमार ( ५.५० कोटी) सनरायझर्स हैदराबाद – हेनरीच क्लासेन ( ५.२५ कोटी)

Live Updates

IPL 2023 Mini Auction Highlights Updates in Marathi: आयपीएल मिनी ऑक्शन २०२३ हायलाइट्स

20:47 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: लिलाव संपला, सॅम करन इतिहासातील सर्वात महागडा ठरला खेळाडू

आयपीएल २०२३ चा मिनी लिलाव संपला असून सॅम करन इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

20:43 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: जाता जाता जो रूट आणि शाकीबला लागली लॉटरी

जो रूटला राजस्थान रॉयल्सने १ कोटी रुपयांना विकत घेतले.

शाकिब अल हसनला कोलकाता नाईट रायडर्सने १.५० कोटी रुपयांना विकत घेतले.

20:40 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: शेवटच्या टप्प्यासाठी सर्व संघासाठी एवढी रक्कम पर्समध्ये बाकी

आयपीएल २०२३ चा लिलावाची शेवटची फेरी सुरु झाली आहे. त्यासाठी सर्व संघांच्या खात्यात किती रक्कम बाकी आहे.

20:27 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: आता न विकलेल्या खेळाडूंवर लागली बोली

मुरुगन अश्विनला राजस्थान रॉयल्सने त्याच्या मूळ किंमत २० लाखांमध्ये खरेदी केले.

मनदीप सिंगला कोलकाता नाईट रायडर्सने ५० लाख रुपयांना विकत घेतले.

आकाश वशिष्ठला राजस्थान रॉयल्सने २० लाख रुपयांना विकत घेतले.

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक याला लखनौ सुपरजायंट्सने ५० लाख रुपयांना विकत घेतले.

युधवीर चरकला लखनौ सुपरजायंट्सने त्याच्या मूळ किंमत २० लाख रुपयांना विकत घेतले.

राघव जुयालला मुंबई इंडियन्सने त्याच्या मूळ किंमत २० लाखांमध्ये खरेदी केले.

अब्दुल पीएला राजस्थान रॉयल्सने २० लाख रुपयांना विकत घेतले.

20:20 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: नाही विकलेल्यांपैकी काही खेळाडूंना पुन्हा एकदा या फेरीत दिली संधी

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज रिले रुसोला दिल्ली कॅपिटल्सने ४.६० कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दासला त्याच्या मूळ किमतीत ५० लाख रुपयांना विकत घेतले.

वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अकिल हुसेनला सनरायझर्स हैदराबादने त्याच्या मूळ किंमत १ कोटी रुपयांत खरेदी केले.

ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पाला राजस्थान रॉयल्सने १.५० कोटी रुपयांना विकत घेतले.

अनमोलप्रीत सिंगला सनरायझर्स हैदराबादने त्याच्या मूळ किंमत २० लाखांमध्ये खरेदी केले.

केएम आसिफला राजस्थान रॉयल्सने ३० लाख रुपयांना विकत घेतले.

19:55 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: चौथ्या फेरीत नंतर संघाकडे किती पैसे बाकी

चौथ्या फेरी नंतर आयपीएल २०२३ मधील सुरु असलेल्या लिलावात किती पैसे बाकी आहेत हे जाणून घ्या.

19:50 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचा कोटा अपूर्ण

कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स यांचा कोटा अजूनही अपूर्ण असल्याने त्यांना ६ खेळाडू निवडून ठेवायला सांगितले आहे.

19:44 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: एक्सलरेटेड बोली सुरू

शम्स मुलाणीला मुंबई इंडियन्सने त्याच्या मूळ किंमत २० लाख रुपये देऊन खरेदी केले.

स्वप्नील सिंगला लखनऊ सुपरजायंट्सने त्याच्या मूळ किंमत २० लाख रुपयांना खरेदी केले.

कोलकाता नाईट रायडर्सने नामिबियाचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड वेसला त्याच्या मूळ किमतीत १ कोटी रुपयांना खरेदी केले.

नितीश कुमार रेड्डी यांना सनरायझर्स हैदराबादने २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

अविनाश सिंगला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६० लाख रुपयांना खरेदी केले. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती.

कुणाल राठोडला राजस्थान रॉयल्सने त्याच्या मूळ किंमत २० लाखांमध्ये खरेदी केले.

सोनू यादवला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याच्या मूळ किंमत २० लाखांमध्ये खरेदी केले.

कुलवंत खेजरोलियाला कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या मूळ किंमत २० लाख रुपये देऊन विकत घेतले.

अजय मोंडलला चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या मूळ किंमत २० लाख रुपये देऊन विकत घेतले.

मोहित राठीला पंजाब किंग्जने त्याच्या मूळ किंमत २० लाखांमध्ये खरेदी केले.

नेहल वढेराला मुंबई इंडियन्सने त्याच्या मूळ किंमत २० लाखांमध्ये खरेदी केले.

भगत वर्माला चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या मूळ किंमत २० लाख रुपयांना विकत घेतले.

शिवम सिंगला पंजाब किंग्जने त्याच्या मूळ किंमत २० लाख रुपये देऊन विकत घेतले.

19:42 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: भारताचा माजी वेगवान गोलंदाज मोहित शर्माला गुजरात टायटन्सकडे

भारताचा माजी वेगवान गोलंदाज मोहित शर्माला गुजरात टायटन्सने त्याच्या मूळ किमतीला ५० लाख रुपयांना विकत घेतले.

19:38 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: विक्रमी बोलीला विकला गेलेला सॅम करनचा भाऊ मात्र अनसोल्ड राहिला

विक्रमी बोलीला विकला गेलेला सॅम करनचा टॅाम करन भाऊ मात्र अनसोल्ड राहिला.

19:34 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: काइल जेमसनला चेन्नईने एक कोटी रुपयांना विकत घेतले

काइल जेम्सनला चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या मूळ किंमत १ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. गेल्या मोसमात तो खेळला नव्हता. त्याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात होता.

19:30 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: एक्सलरेटेड बोली सुरू

विष्णू विनोदला मुंबई इंडियन्सने त्याच्या मूळ किंमत २० लाखांमध्ये खरेदी केले.

विद्वत कवेरप्पाला पंजाब किंग्जने त्याच्या मूळ किंमत २० लाख रुपयांना विकत घेतले.

राजन कुमारला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७० लाख रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती.

सुयश कुमारला कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या मूळ किंमत २० लाख रुपये देऊन विकत घेतले.

19:27 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: जोशुआ लिटिलला गुजरात टायटन्सने हेरले

आयरिश वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलला गुजरात टायटन्सने ४.४० कोटी रुपयांना विकत घेतले. टी२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम लिटलच्या नावावर आहे. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्याने हॅट्ट्रिक विकेट्स घेतल्या.

19:17 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: एक्सलरेटेड बोली सुरू

मयंक डागरला सनरायझर्स हैदराबादने १.८० कोटी रुपयांना विकत घेतले.

मार्को जॅनसेनचा भाऊ डुआन जॅन्सन याला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांना विकत घेतले.

प्रेरक मंकडला लखनौ सुपरजायंट्सने २० लाख रुपयांना विकत घेतले.

यष्टिरक्षक फलंदाज डोनोव्हान फरेराला राजस्थान रॉयल्सने ५० लाख रुपयांना विकत घेतले.

उर्विल पटेलला गुजरात टायटन्सने त्याच्या मूळ किंमत २० लाख रुपये देऊन खरेदी केले.

19:15 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: एक्सलरेटेड बोली सुरू

पियुष चावलाला मुंबई इंडियन्सने ५० लाख रुपयांना खरेदी केले.

लेगस्पिनर अमित मिश्राला लखनौ सुपरजायंट्सने त्याच्या मूळ किंमत ५० लाख रुपयांना विकत घेतले.

हरप्रीत भाटियाला पंजाब किंग्सने ४० लाख रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २० लाख होती.

मनोज भंडागेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मूळ किंमतीला विकला गेला.

18:37 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: उपहारापर्यत संघांनी लावली करोडोंची बोली, उरलेल्या रकमेत करावी लागणार कसरत

आयपीएल २०२३च्या लिलावात आतापर्यत सर्व संघांनी करोडोंची बोली लावली आहे. आता उरलेल्या रकमेत त्यांना कसरत करावी लागणार. त्यात ते कशी खरेदी करतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

18:05 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: लखनऊच्या संघात दाखवणार डॅनियल सॅम्स कमाल

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल सॅम्सला लखनऊ सुपरजायंट्सने त्याच्या मूळ किंमत ७५ लाख रुपयांना विकत घेतले. अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी विकला गेला नाही. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेन पारनेलही अनसोल्ड राहिला. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशमला कोणीही विकत घेतले नाही ही खूप मोठी घडामोड राहिली. आशिया चषक जिंकून देणारा श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकालाही कोणी विकत घेतले नाही.

17:57 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: विल जॅक्सला आरसीबीने विकत घेतले

इंग्लंडचा फलंदाज विल जॅक्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३.२० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. जॅकने टी२० फॉरमॅटमध्ये १०२ सामन्यांमध्ये १५४.४ च्या स्ट्राइक रेटने २५३२ धावा केल्या आहेत. टी २० मधील त्याची सर्वोत्तम नाबाद १०८ धावा आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडला कोणीही विकत घेतले नाही.

17:54 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज मनीष पांडे दिल्ली संघात दाखल

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज मनीष पांडे दिल्ली संघात दाखल झाला. त्याला २ कोटी ४० लाखाला विकत घेतले. आधी तो हैदराबादकडे होता.

17:34 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: या अनकॅप खेळाडूंनी दाखवली कमाल

एन जगदीशन ९० कोलकाता, केएस भरत १ कोटी २० लाख गुजरात, उपेंद्र सिंह यादव २५ लाख हैदराबाद, वैभव ६० लाख कोलकाता यश ठाकूर ४५ लाख लखनऊ आणि हिमांशू शर्मा २० लाख बंगळूर यांना या हंगामात खेळण्याची संधी मिळणार आहे. तर मोहम्मद अझरूद्दीन, के एम असिफ, मुज्तबा युसुफ, लान्स मॉरेस, चिंतल गांधी, मुरुगन अश्विन, श्रेयस गोपाल, एस मिधून, इजारुल हक नवीद हे अनसोल्ड राहिले.

17:22 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: मुकेश कुमारसाठी पंजाब आणि दिल्लीमध्ये रस्सीखेच

मुकेश कुमारसाठी पंजाब आणि दिल्लीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मूळ किंमत २० लाखापासून त्याने तब्बल ५ कोटी ५० लाख कमावले. त्याला दिल्लीने विकत घेतले.

17:18 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: भारताच्या शिवम मावीने अनकॅप खेळाडू म्हणून शानदार कमाई केली

भारताच्या या अनकॅप खेळाडूंनी चांगलीच कमाल दाखवली. शिवम मावीने अनकॅप खेळाडू म्हणून शानदार कमाई केली. गुजरात आणि राजस्थान मध्ये त्याच्यासाठी चढाओढ सुरु होती. त्याने तब्बल ६ कोटी कमावाले शेवटी तो हार्दिक पांड्याच्या संघात सामील झाला.

16:57 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: भारताच्या जम्मू-काश्मीरचा खेळाडू विव्रत शर्मा गेला हैदराबादच्या ताफ्यात

भारताच्या जम्मू-काश्मीरचा खेळाडू विव्रत शर्मा हैदराबादच्या ताफ्यात गेला. त्याला २ कोटी ६० लाखाला विकत घेतले. तर समर्थ व्यास आणि रिंकू सिंग या दोघांना २० लाखात विकत घेतले.निशांत सिंधूला चेन्नईने विकत घेतले. मात्र सौरभ कुमार, प्रियम गर्ग, कॉर्बिन बोश, अभिमन्यू ईश्वरन, शशांक सिंह, सुमित कुमार, दिनेश बाणा हे अनसोल्ड राहिले.

16:51 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: भारताचे अनकॅप खेळाडूंपैकी अनेक खेळाडू राहिले अनसोल्ड

भारताचे अनकॅप खेळाडूंपैकी अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. त्यात अनमोलप्रीत सिंग, चेतन एल. आर., शुभम खजुरिया आणि हिमंत सिह हे सर्व अनसोल्ड राहिले. तर शेख राशीदला २० लाखात चेन्नईने विकत घेतला.

16:46 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: पुढच्या टप्प्यात या खेळाडूंवर असणार नजर

भारताचे अनकॅप खेळाडू यांच्यावर या टप्प्यात नजर असणार आहे.

16:43 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: तिसऱ्या टप्प्यानंतर कोणाच्या खात्यात किती रक्कम

तिसऱ्या टप्प्यानंतर कोणाच्या खात्यात किती रक्कम यावरून पुढच्या लिलावाची दिशा ठरणार आहे.

16:31 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: इंग्लंडचा आदिल राशिदला हैदराबादने विकत घेतले

इंग्लंडचा आदिल राशिदला हैदराबादने २ कोटीला विकत घेतले. अ‍ॅडम मिलने, तर मयंक मार्कंडेय हा ५० लाखाला विकला गेला. अकील हुसेन, अ‍ॅडम झॅम्पा, तबरेज शम्सी, मुजीब उर रहमान हे सर्व अनसोल्ड राहिले.

16:25 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: जयदेव उनाडकट मूळ किमतीला विकला गेला

भारताचा डावखुरा गोलंदाज जयदेव उनाडकट मूळ किमतीला विकला गेला. त्याला ५० लाखात लखनऊ सुपर जायंट्सने विकत घेतले. जॉय रिचर्डसनला १ कोटी ५० लाखाला मुंबईने तर इशांत शर्माला ५० लाखात दिल्लीने विकत घेतले.

16:20 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: हेन्री क्लासेनला काव्या मारनने केले खरेदी

दक्षिण आफ्रिकेचा हेन्री क्लासेनला काव्या मारनच्या हैदराबादने ५.२५ कोटीला खरेदी केले. तिकडे दिल्ती कॅपिटल्सने फील सॅाल्टला २ कोटीला विकत घेतले. तर श्रीलंकेचा कुशल मेंडीस आणि टॉम बेंटन अनसोल्ड राहिला. महत्वाची बाब म्हणजे ख्रिस जॉंर्डन अनसोल्ड राहिला. न्यूझीलंडचा रीस टॅाप्लेला बंगळूरने १ कोटी ९० लाखाला विकला गेला.

16:11 (IST) 23 Dec 2022
IPL Auction: आयपीएल २०२३ मिनी लिलावातील तिसरा टप्प्याला सुरुवात

आयपीएल २०२३ मिनी लिलावातील तिसरा टप्प्याला सुरुवात झाली आहे. बांगलादेशच्या एकदिवसीय आणि टी२० चा कर्णधार ठरला अनसोल्ड. तर वेस्ट इंडीजचा धडकेबाज फलंदाज निकोलस पूरन साठी रस्सीखेच सुरु आहे. दिल्ली आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोघेही त्याच्यासाठी आग्रही पाहायला मिळाले. शेवटी तो लखनऊच्या ताफ्यात गेला. त्याला १६ कोटीला खरेदी केले.

IPL 2023 Mini Auction Live Updates Team Player List

IPL 2023 Mini Auction Highlights Updates in Marathi: आयपीएल मिनी ऑक्शन २०२३ हायलाइट्स

Story img Loader