PBKS vs RR Highlights, Indian Premier League 2023: राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२३च्या त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. राजस्थानच्या या विजयामुळे त्यांनी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने पाच गड्यांच्या मोबदल्यात १८७ धावा केल्या मात्र राजस्थानने दोन चेंडू शिल्लक असताना सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह राजस्थानचा संघ १४ सामन्यांतून १४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर पंजाब विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचेही प्रत्येकी १४ गुण आहेत. पण दोघांचे १-१ सामने बाकी आहेत. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तर हैदराबाद, दिल्ली आणि पंजाबचा प्रवास संपला आहे. केकेआर शर्यतीत असेल पण त्यांचा नेट रनरेट कमी आहे, त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal : ‘शीशमहल’चा मुद्दा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणार? नवी दिल्लीची जागा जिंकण्यासाठीचा मुख्य अडसर?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
Pakistan preparations for Champions Trophy slow sport news
चॅम्पियन्स करंडकाची तयारी पाकिस्तानकडून संथगतीने; बहुतेक केंद्रांचे नूतनीकरण अपूर्णच

लीगमध्ये चार सामने बाकी आहेत

आता आयपीएल २०२३मध्ये फक्त चार साखळी सामने शिल्लक आहेत. आज दिवसाच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. दुसऱ्या सामन्यात केकेआरचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. रविवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादनंतर आरसीबी आणि गुजरात यांच्यात सामना होणार आहे.

लखनऊ आणि चेन्नई हे समीकरण

चेन्नई आणि लखनऊने आपापले सामने जिंकल्यास ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. पण त्यांना नेट रनरेटचीही चिंता आहे. लखनऊचा नेट रनरेट जर सुधारला तर ते नंबर-२ वर असतील आणि त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दोन संधी मिळतील. मात्र, यासाठी मुंबई आणि आरसीबी पराभूत होतील अशी अपेक्षा करावी लागेल. या प्रकरणात दोघेही प्लेऑफमध्ये पोहोचतील पण लखनऊ दुसऱ्या क्रमांकावर असेल. मुंबई आणि आरसीबीने आपापल्या लढती जिंकल्या तर लखनऊ आणि चेन्नईतील यांच्यापैकी जो विजयी होईल तो प्ले ऑफ मध्ये पोहचेल.

मुंबईसाठी कसे असेल समीकरण?

१४ गुणांसह मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट सर्वात वाईट आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना हैदराबादला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागेल. यामुळे लखनऊ, चेन्नई आणि आरसीबी यापैकी कोणताही एक संघ आपला सामना हरेल अशी अपेक्षा करावी लागेल. त्यांचा जो काही निकाल असेल त्यावरचं मुंबई प्ले ऑफमध्ये जाणार की नाही हे निश्चित होईल.

आरसीबीसाठी समीकरण?

आरसीबीने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा १००+ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे त्याचा नेट रनरेट खूपच चांगला झाला आहे. लखनऊ, चेन्नई आणि मुंबईने आपापले सामने जिंकले तरी आरसीबी गुजरातला हरवून प्लेऑफमध्ये पोहोचेल. अशा स्थितीत मुंबई इंडियन्स बाहेर पडेल.

हेही वाचा: IPL2023: “…तर अधिकच्या पैश्यामुळे युवा खेळाडू भरकटू शकतात” के.एल. राहुलचे सूचक विधान

राजस्थानची परिस्थिती?

चेन्नई आणि लखनऊमधील सामन्यांचा राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण दोघांचेही राजस्थानपेक्षा जास्त गुण आहेत. राजस्थानला फरक पडणार आहे तो म्हणजे मुंबई आणि आरसीबी यांच्या सामन्याचा. कारण, राजस्थानचा रनरेट मुंबई इंडियन्सपेक्षा खूपच चांगला आहे. अशा स्थितीत जर मुंबईचा हैदराबादविरुद्धच पराभव झाला तर राजस्थानच्या आशा वाढतील. तिथे त्यांना फारसा फरक पडणार नाही. पण आरसीबीचा नेट रनरेट राजस्थानपेक्षा चांगला आहे. अशा परिस्थितीत आरसीबी गुजरातकडून किमान ६ धावांनी किंवा ४ चेंडू राखून पराभूत होईल, अशी आशा राजस्थानला करावी लागेल. असे झाल्यास चेन्नई आणि लखनऊसह राजस्थानला प्लेऑफमध्ये स्थान मिळेल.

Story img Loader