Sunil Gavaskar on ECB : आयपीएलचा १७वा हंगात आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत या हंगामात ६० सामने खेळले गेले आहेत, ज्यामधून फक्त कोलकाता नाईट रायडर्स संघ बाद फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज बाद फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीमुळे बाहेर पडले आहेत. आता उर्वरित संघाना प्रत्येक संघाला विजय मिळवणे आवश्यक आहेत. अशात विदेशी क्रिकेट बोर्ड टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी लवकर माघारी बोलवत आहेत. यावर माजी भारतीय खेळाडू सुनील गावसकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

परदेशी खेळाडूंची फी कपात करावी –

टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमधून लवकर मायदेशी परतण्यास त्यांच्या बोर्डाकडून सांगितले आहे. यावर सुनील गावसकरांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डावर हल्लाबोल केला आहे. बीसीसीआयने खेळाडू आणि त्यांच्या क्रिकेट बोर्डाला धडा शिकवावा, अशी सूचना गावसकरांनी केली आहे. माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी मिड-डेच्या स्तंभात लिहले की, “मी अशा खेळाडूंचे समर्थन करतो, जे आपल्या देशाला प्रथम प्राधान्य देतात. परंतु प्रथम स्वत: ला संपूर्ण लीगसाठी उपलब्ध असल्याचे घोषित केल्यानंतर परत मधूनचा माघारी जाणे योग्य नाही. कारण त्यांनी दोन-तीन वर्षे देशासाठी खेळूनही जेवढे पैसे मिळत नाहीत, त्यापेक्षा जास्त पैसे फ्रँचायझी त्यांना एक हंगाम खेळण्यासाठी देतात.”

Brazil police officer
अशी लेक प्रत्येक बापाला मिळो! वडिलांच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी पोलीस झाली, २५ वर्षांनी पकडला गेला आरोपी
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
IPL 2025 Sunrisers Hyderabad bowling coach Dale Steyn
IPL 2025 पूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का! ‘या’ कोचने आगामी हंगामातून घेतली माघार
Loksatta kutuhal Field tactics through artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेतून मैदानातील डावपेच
job opportunity
नोकरीची संधी: देशाच्या सीमेचे रक्षण करण्याची सुवर्णसंधी
IPL Auction 2025 BCCI Reveals Deadline for Franchises to Announce retained players list As Per Reports
IPL Auction 2025: आयपीएल संघांना मिळाली डेडलाईन? ‘या’ तारखेपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार
IPL 2025 retention uncapped player rule benefit for three teams
IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जसह ‘या’ तीन फ्रँचायझींना होणाार ‘अनकॅप्ड प्लेयर्स’च्या नवीन नियमाचा फायदा
IPL Auction 2025 Oversears Player Will be Banned for 2 Years If Unavailable After Picked in Auction New Rule by BCCI
IPL Auction 2025: विदेशी खेळाडूंवर वचक बसवण्यासाठी BCCI ची युक्ती, आयपीएलमध्ये ‘हा’ नियम मोडल्यास दोन वर्षांची बंदी

त्यांच्या क्रिकेट बोर्डालाही कमिशनचे पैसेही देऊ नये –

सुनील गावसकर पुढे म्हणाले, “त्यामुळे फ्राँचायझींना अशा खेळाडूंच्या फीमधून मोठी रक्कम कापण्याची परवानगी तर दिलीच पाहिजे, पण तो खेळाडू कोणत्या बोर्डाचा आहे, प्रत्येक खेळाडूला मिळालेल्या फीच्या १०% रक्कमही त्या बोर्डाला देऊ नये.” कारण फ्रँचायझी प्रत्येक परदेशी खेळाडूच्या मॅच फीच्या १० टक्के रक्कम त्या देशाच्या क्रिकेट बोर्डाला देते.

हेही वाचा – KKR vs MI : कोलकाताच्या स्टार खेळाडूवर BCCIची मोठी कारवाई, मॅच फीच्या तब्बल ‘इतका’ टक्के ठोठावला दंड

ईसीबीने काय म्हटले होते?

काही आठवड्यांपूर्वी, ईसीबीने एका निवेदनात २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंना २२ मे पासून पाकिस्तान विरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी राष्ट्रीय कर्तव्यावर परतण्यास सांगितले होते. ईसीबीने निवेदनात म्हणाले होते, “या मालिकेसाठी निवडलेले खेळाडू, जे सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहेत. २२ मे २०२४ रोजी हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी वेळेत परततील.”

हेही वाचा – IPL 2024 : कोलकाता प्लेऑफ्समध्ये; मुंबईवर दणदणीत विजयासह बाद फेरी गाठणारा पहिलाच संघ

इंग्लंड संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी सांगितले की, कर्णधार जोस बटलरने इंग्लिश खेळाडूंना आयपीएलच्या प्लेऑफमधून माघार घेण्यास सांगितले आहे. जोस बटलर व्यतिरिक्त, इंग्लंडचे खेळाडू फिलिप सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, विल जॅक्स आणि रीस टोपले हे खेळाडू आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेच्या इंग्लंड संघाचा भाग आहेत. गेल्या आठवड्यात, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी, राजस्थान रॉयल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनी देखील म्हटले होते की, जोस बटलरची अनुपस्थिती संघाचे मोठे नुकसान असेल.