मुंबई इंडियन्स संघ सध्या आयपीएलमध्ये स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी झगडत आहे. मुंबईला उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. मुंबईचे सलामीवीर चांगल्या फॉर्मात असले तरी संघाला विजय मिळवणे म्हणावे तितके शक्य होऊ शकलेले नाही. आज मुंबईचा पंजाबशी सामना होणार आहे. मात्र त्या पेक्षा जास्त चर्चा आहे ती मुंबई इंडियन्सकडून एकेकाळी सलामीवीर म्हणून खेळलेल्या एका खेळाडूची.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या एका परदेशी खेळाडूने चक्क शिक्षणासाठी क्रिकेटला अलविदा केल्याचे म्हंटले जात आहे. या खेळाडूने सचिन तेंडुलकरबरोबर मुंबईच्या सलामीची धुरा सांभाळली होती. मात्र आता एमबीएचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी या खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज एडन ब्लिझार्ड.

ब्लिझार्डने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. माझे एमबीएचे शिक्षण राहिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी निवृत्ती स्वीकारत आहे. तसेच मी माझ्या पत्नीला तिच्या व्यवसाय सहकार्य करणार आहे. मी सुमारे १५ वर्षे क्रिकेट खेळलो. मात्र आता मला माझ्या शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आणि तसेच आता मला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे, असे तो म्हणाला.

ब्लिझार्डने ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती दिली आहे. मी क्रिकेट खेळलो. मला त्यात आनंद मिळाला. मात्र आता मला ‘फॅमिली मॅन’ व्हायचं आहे. आणि करिअरच्या इतर विविध संधी शोधायच्या आहेत, असेही ब्लिझार्ड म्हणाला.

ब्लिझार्ड हा ‘टी२० स्पेशलिस्ट’ खेळाडू म्हणून जास्त लोकप्रिय ठरला. त्याने ऑस्ट्रलियाकडून १३२.५७च्या स्ट्राईक रेटने ९८ टी२० सामने खेळले. मात्र आता त्याने निवृत्ती स्वीकारली आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiden blizzard announces retirement for mba family