आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या रंगतदार सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. चेन्नईच्या या विजयात महत्वाची भूमिका बजावली ती कर्णधार महेंद्रसिंह धोनीने. आपण अजूनही उत्तम मॅच फिनिशर असल्याचे धोनीने या सामन्यातून दाखवून दिले. फक्त फलंदाजीतच नव्हे यष्टीपाठीही चमकदार कामगिरी करुन धोनीने सामन्याचा नूरच पालटून टाकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका टोकाकडून एबी डिव्हीलीयर्सची दमदार फलंदाजी सुरु असताना आरसीबीची मोठया धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु होती. पण डावाच्या शेवटच्या षटकात लागोपाठ विकेट गमावल्यामुळे आरसीबीला २०५ धावांच करता आल्या. शेवटच्या क्षणाला धोनीने चपळता दाखवत दोन रनआऊट केले. त्यामुळे आरसीबीच्या धावगतीला काहीसा ब्रेक लागला. ज्याचा परिणाम सामन्यावर झाला.

शेवटचे षटक टाकणाऱ्या ड्वेन ब्रावोचा पहिला चेंडू यष्टीपाठी धोनीकडे गेला. पण चेंडू निर्धाव जाऊ नये म्हणून फलंदाज धाव घेण्यासाठी पळाला. त्यावेळी धोनीने चपळता दाखवत कोलिन डी ग्रांडहोमला धावबाद केले. कोलिन बाद झाल्यामुळे अंतिम षटकात वेगाने धावा जमवण्याच्या आरसीबीच्या अपेक्षांना सुरुंग लागला. त्यानंतर ब्रावोच्या दुसऱ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदर मोठा फटका खेळला. एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या रनसाठी पळत असताना सीमारेषेवरुन जाडेजाने केलेल्या थ्रो वर धोनीने नेगीला धावबाद केले. लागोपाठ दोन विकेट गेल्यामुळे आरसीबीच्या धावगतीला ब्रेक लागला.

त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने ३४ चेंडूत ७ षटकारांची आतषबाजी करत फटकावलेल्या नाबाद ७० धावा आणि ५३ चेंडूत ८२ धावांची दमदार खेळी करणारा अंबाती रायडू यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि एबी डिव्हीलियर्स यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आपल्या घरच्या मैदानावर धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, २०६ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघाने धोनी आणि रायडूच्या खेळीमुळे २ चेंडू आणि ५ गडी राखून विजय मिळवला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयात मोलाची भूमिका वठवली.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheenai super kings vs royal challengers banglore ipl