चेन्नई सुपर किंग्ज संघ यंदाच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीत पोहोचला आहे. या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेकांचे मोलाचे योगदान आहे. फलंदाजांनी अनेक वेळा त्यांना तारले आहे. तर काही वेळा फिरकीच्या बळावर त्यांनी विजय प्राप्त केला आहे. या फिरकीच्या गणितात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने सर्वाधिक विश्वास हा इम्रान ताहीरवर टाकलेला आहे. आणि मुख्य म्हणजे त्यानेही हा विश्वास सार्थ ठरवला आहे. पण सध्या सोशल मीडियावर या साऱ्याची चर्चा रंगली नसून इम्रानच्या मुलाची चर्चा रंगली आहे.
इम्रान ताहिर हा गडी बाद केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचे सेलिब्रेशन करतो हे तर आपण साऱ्यांनी पाहिलं आहेत. मात्र हेच सेलिब्रेशन त्याच्या मुलानेही करून दाखवले आहे. ‘तुझे वडील गडी बाद केल्यावर कशा पद्धतीने सेलिब्रेट करतात?’ असा प्रश्न इम्रान ताहिरचा मुलगा जिब्रान याला विचारण्यात आला होता. इम्रान स्वतः तिचे हजर असूनही जिब्रानने अजिबात विलंब लावला नाही. लगेच त्याने आपल्या बाबांची सुंदर नक्कल केली. इतकेच नाही तर इम्रानसारखाच गुडघ्यांवर स्लिप होऊनही दाखवले. यावेळी प्ले ऑफ मधील चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार फाफ डू प्लेसीस होता. साऱ्यांनी त्याचे नंतर कौतुकही केले.
हा पहा व्हिडीओ –
We asked Gibran what does his dad do when he takes a wicket and this is what happened! Don’t miss the fafulous slide in the presence of @ImranTahirSA and @faf1307 himself! #JuniorParasakthiExpress #WhistlePodu pic.twitter.com/PsSA3AFr96
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 24, 2018