कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आपल्या डावपेचांसाठी कायम चर्चेत असतो. अत्यंत कठीण परिस्थितीत सामन्यात वेगळेच निर्णय घेऊन अनेकदा तो साऱ्यांना अवाक करतो. सहसा धोनीचे डावपेच फसल्याचे दिसून येत नाही. मात्र, राजस्थानविरुद्ध झालेल्या आयपीएलच्या सामन्यात मात्र एक अजब गोष्ट घडली. कदाचित ही घटना घडल्यामुळेच धोनीचे डावपेच फसले आणि राजस्थानने ४ गडी राखून चेन्नईवर विजय मिळवला, असे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजस्थान विरुद्ध चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत १७६ धावा केल्या. १७७ धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने कडवी झुंज देत शेवटच्या षटकात सामना जिंकला. मात्र या षटकाआधी एक अशी गोष्ट घडली, ज्यामुळे चेन्नईने हा सामना गमावला असल्याची चर्चा आहे.

धोनीला पडला शेवटच्या षटकाचा विसर?

डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राजस्थानचा कृष्णप्पा गौथम बाद झाला. त्यानंतर एक षटक शिल्लक असल्याचे विसरून सामना संपला असा समज करून घेत धोनी सरळ डगआउटकडे चालू लागला आणि त्याला एक षटक शिल्लक राहिले असल्याचे समजल्यावर तो पुन्हा पिचकडे परतला असे वृत्त आहे.

ही घटना घडल्यानंतर अंतिम षटक टाकण्यासाठी धोनीने ब्राव्होला पाचारण केले. मात्र जोश बटलरने सरस खेळ करत राजस्थानला सामना जिंकवून दिला. या विजयामुळे राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान जिवंत आहे. मात्र धोनीबरोबर ही घटना घडल्यामुळे १९वे षटक हेच २०वे षटक आहे, असे धोनीला वाटले असावे आणि म्हणून त्याचे डावपेच यशस्वी होऊ शकले नाहीत, अशा कंमेंट्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, या पराभवाबाबत धोनीला सामना संपल्यावर विचारले असता तो म्हणाला की १७७ धावांचा पाठलाग करणे हे आव्हानात्मक होते. पण संघातील गोलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. या खेळपट्टीवर गोलंदाजी कशी करायची याच्या सूचना गोलंदाजांना दिल्या गेलेल्या होत्या. पण गोलंदाजांनी त्यानुसार गोलंदाजी केली नाही.

After taking the catch of Krishnappa Gowtham off a delivery by David Willey on the final ball of the 19th over, MS Dhoni made his to the dugout, without realising a final over was still remaining, as reported by ESPNCricinfo.