बऱ्याच दिवसांनी लिहीतोय, निमीत्त आहे आयपीएलच्या अकाराव्या हंगामातील अंतिम सामन्यात मराठी समालोचनाचं. रविवारी दिवसभर स्टार प्रवाहवर आयपीएलच्या अंतिम सामन्याचं मराठीमध्ये समालोचन (कॉमेंट्री) करण्यात आली. अमोल मुझुमदार, चंद्रकांत पंडीत, सुनंदन लेले आणि संदीप पाटील अशी दिग्गज मंडळी काल मराठीतून सामन्याचं विश्लेषण करत होती. आता काम म्हटलं की त्यात चूका या होणारचं, काही अक्षम्य चुकाही होणार.

१) उदाहरणार्थ काल संदीप पाटलांकडून जोस बटलर-बेन स्टोक्स या राजस्थानच्या खेळाडूंचं हैदराबाद कनेक्शन लावण्यात आलं. सर्वप्रथम ही चूक मोठी आहे हे मान्यच केलं पाहिजे. संदीप पाटलांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीकडून, आजबाजूला माहितीचं भांडार उपलब्ध होत असताना अशा चुका होणं अपेक्षित नाही…त्याचं समर्थन अजिबात करता येणार नाही कोणी करुही नये.

no alt text set
आयपीएलमुळेच मला कसोटी संघात जागा मिळाली – जोस बटलर
no alt text set
IPL सट्टेबाजीमध्ये फक्त अरबाज नव्हे आणखी काही बडे…
no alt text set
चौकशी संपवून बाहेर आल्यानंतर अरबाज खान म्हणाला….
no alt text set
अरबाज खानच्या सट्टेबाजीशी आमचे काही देणे-घेणे नाही – IPL चेअरमन
no alt text set
सट्टेबाजीमध्ये अरबाज खानने गमावले इतके कोटी रुपये
no alt text set
अरबाज खानने IPL सामन्यांवर सट्टा लावल्याची दिली कबुली
no alt text set
IPL 2018 – ‘हे’ माझ्या कारकिर्दीतील ३ सर्वोत्कृष्ट बळी : रशीद खान
no alt text set
IPL 2018 – धोनीच्या चेन्नई संघाचा आणखी एक विक्रम
no alt text set
IPL 2018 – … म्हणून रशीद खानला कमी पडल्या फक्त तीन विकेट

२) यानंतर सोशल मीडियावर काहींनी मराठी उच्चारणाबद्दल, मराठी शब्दांबद्दल आक्षेप घेतले. हे आक्षेप देखील मान्य, मराठीतून समालोचन करताना धावा, आखूड टप्प्याचा चेंडू, यष्टीरक्षक आणि यासारखे तत्सम मराठी शब्द कानावर पडणं अपेक्षित असतं..त्यामुळे या बाबतीत प्रेक्षकांची झालेली निराशाही अगदीच मान्य.

…..पण हा प्रकार काल इथेच थांबला नाही. या चुकांवरुन काल समालोचन करणाऱ्या मंडळींना ट्रोल केलं गेलं. जमतं नाही तर बसता कशाला कॉमेंट्री करायला, भाषेची पार वाट लावली या लोकांनी, यांना हे जमणारच नाही, दारु पिऊन बसलेत का?? वगैरे वगैरे…अशा अनेक प्रतिक्रीया वाचायला मिळाल्या.

एका घटनेवरुन लगेच निष्कर्षापर्यंत पोहचण्याची घाई आपण नेहमी का करत असतो?? टेलिव्हीजन क्रिकेटमध्ये मराठी समालोचनाच्या दृष्टीने हे पहिलं मोठं पाऊल पडलं होतं, अशा वेळी कोणी कितीही तयारी केली असली तरीही ऐनवेळा काहीतरी राहून जाणारचं, चुका या होणारचं हे आपण समजून चालायला हवं असं नाही का वाटतं? पहिल्याच प्रयत्नात सगळं पिक्चर परफेक्ट कसं बरं होईल.  पुन्हा एकदा स्पष्ट करतो, मराठी भाषेचा योग्य वापर, क्रिकेटमध्ये इंग्रंजी शब्दांना प्रचलिच मराठी शब्द या सर्व गोष्टींचं भान ठेवल जाणं गरजेचं आहेच. या बाबतीत मराठी समालोचक जिकडे चुकले असतील तिकडे ती चूक दाखवणं हे प्रेक्षक म्हणून आपलं काम आहेच. पण झालेली चूक आपल्या निदर्शनास पडली आणि ट्रोल करण्यासाठी आयती संधी आता हातात आली अशा मानसिकतेून या प्रयत्नांवर टीका करणं हे योग्य नाही.

भारतीय क्रीडा क्षेत्रात अग्रगण्या वाहिनी म्हणून ओळख असलेल्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीने गेल्या काही महिन्यांमध्ये आपली तामिळ वाहिनी सुरु केली. या वाहिनीवर क्रिकेटचे कार्यक्रम, सामन्यांचं समालोचन हे तामिळमध्येच केलं जातं. यानंतर मराठीत क्रीडा वाहिनी का नाही अशी ओरड मध्यंतरी क्रीडाप्रेमी मराठी तरुणांमध्ये सुरु झाली होती. मात्र टीव्ही प्रोडक्शन क्षेत्रात माझ्या परिचित ज्येष्ठ व्यक्तीशी झालेल्या चर्चेनंतर एक गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते ती म्हणजे, काही महिन्यांपूर्वी मराठी क्रीडा वाहिनी सुरु करण्याचे प्रयत्न झाले होते. यावेळी प्रेक्षकांचा कल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आलं होतं, मात्र दुर्दैवाने या सर्वेक्षणात मराठी लोकांनी आपल्या मालिकांचा प्राईम टाईम सोडून मराठीतून क्रीडा कार्यक्रम किंवा समालोचन पाहण्यास/ऐकण्यास नापसंती दर्शवली. सुदैवाने आपल्या भाषेबद्दल आग्रही असलेल्या तामिळनाडूने तामिळ भाषेतून समालोचन एकण्यास आवडेल असा कल दिला होता. यानंतर काही दिवसांपूर्वी फेसबूक आणि ट्विटरवर कार्यरत असलेल्या, मराठी बोला चळवळ, मराठी एकीकरण समिती यासारख्या कम्युनिटीजनी स्टारकडे आयपीएल सामन्याचं मराठी प्रेक्षपण करण्याची मागणी लावून धरली होती. यासाठी फेसबूक, ट्विटरवर पाठपुरावाही करण्यात आला. यानंतर अखेरल कालच्या अंतिम सामन्याचं मराठीतून समालोचन करण्यात आलं. अशावेळी आपण केलेलं ट्रोलिंग एका चांगल्या प्रयत्नांना खिळ तर घालतं नाहीये ना हे आपण पहायला नको का??

आता माझ्या आठवणीतला एक किस्सा सांगतो,  २०१७ साली मी स्टार स्पोर्ट्समध्ये असताना हॉटस्टारसाठी आयपीएलचे शो करायचो. एका मॅचदरम्यान भारतीय संघाचा एक नावाजलेला ज्येष्ठ खेळाडू (मुद्दाम नावं घेत नाहीये, कारण मीडियाचं जग छोटं असतं असं म्हणतात) हिंदीतून कॉमेंट्री करत होता. सामना कोणाचा होता हे आठवत नाही, पण पहिली इनिंग संपल्यानंतर मध्ये काही मिनीटांचा ब्रेक होता…हा ब्रेक संपल्यानंतर दुसऱ्या डावासाठी खेळाडू मैदानात उतरले..मात्र कॉमेंट्री करणारी टीम आपल्या खुर्चीवर येईना. ती सर्व मंडळी कानातले इअरपिस काढून पाठीमागच्या खुर्चीवर गप्पांत रंगली होती. इकडे सामना सुरु झाला…पहिले २ चेंडू टाकले गेले, पीसीआसरमधून टेक्निकल डिरेक्टर कॉमेंट्री टीमच्या नावे ठणाणा करत होता. दोन चेंडू टाकून झाल्यानंतर त्या माजी खेळाडूला जाग आली आणि ते आपल्या खुर्चीपाशी धावले….आणि हातात माईक आल्यानंतर त्यांच्या तोंडून आलेलं पहिलं वाक्य होतं, ओय तेर्री मॅच शुरु भी हो गया क्या????

टिव्हीच्या दुनियेत ही चूक मोठी आहे, मात्र त्यावेळी त्या खेळाडूच्या सहकाऱ्याने बाजू सावरुन धरली. माझ्या म्हणण्याचा मुद्दाही हाच होता, की चुका या होणारचं. चुका कोणाकडून होत नाहीत…पण एखादी चूक झाल्यानंतर तिला वाट्टेल तसं ट्रोल करायचं आणि मोराल डाऊन करायचं हा प्रकार चांगला नाही. यामुळे प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांंचा धीर खचू शकतो. जिथे चूक झाली तिकडे जरुर बोला, पण एखादा चुकला म्हणून त्याचे पाय खेचू नका. दुर्दैवाने याच कारणासाठी मराठी माणूस ओळखला जातो, अशा ट्रोलंदाजीतून आपण आपला हाच गुणधर्म पुन्हा एकदा सिद्ध करतो आहोत.

आपल्या प्रतिक्रीया prathmesh.dixit@indianexpress.com यावर जरुर कळवा