रविवारी पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थान रॉयल्सवर मात करुन प्ले-ऑफच्या शर्यतीत आपली दावेदारी पक्की केली. अंबाती रायडूच्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबादला पराभवचा धक्का दिला. मात्र रविवारी रात्री मुंबईच्या वानखेडे मैदानावर, मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्याचा निकाल चेन्नईसाठी फायदेशीर ठरला आहे. मुंबईचा पराभव झाल्यामुळे चेन्नईचा संघ प्ले-ऑफच्या सामन्यांसाठी आता पात्र ठरणार आहे. यानंतर उरलेल्या सामन्यांचा काय निकाल लागतो यावर चेन्नईचं भवितव्य अवलंबून असणार नाहीये.

या आक्रमक खेळीसोबत चेन्नई सुपरकिंग्ज संघाने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. आयपीएलच्या अकरा हंगामांपैकी ९ हंगाम चेन्नईने प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये प्रवेश मिळवला आहे. असा विक्रम करणारा चेन्नई हा एकमेव संघ ठरला आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नईचा इतिहास –

२००८ – उप-विजेते (अंतिम फेरीत राजस्थानकडून पराभूत)

२००९ – उपांत्य फेरी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव)

२०१० – विजेते (अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सचा पराभव)

२०११ – विजेते (अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव)

२०१२ – उप-विजेते (अंतिम फेरीत कोलकात्याकडून पराभूत)

२०१३ – उप-विजेते (अंतिम फेरीत मुंबईकडून पराभूत)

२०१४ – उपांत्य फेरी (किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पराभूत)

२०१५ – उप-विजेते (अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सकडून पराभूत)

२०१६ – स्पॉट फिक्सींग प्रकरणी निलंबीत

२०१७ – स्पॉट फिक्सींग प्रकरणी निलंबीत

Story img Loader