आज कोलकाता नाइट रायडर्सशी सामना

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वानखेडे स्टेडियमवर शनिवारी मुंबई इंडियन्सला हरवून आयपीएलच्या व्यासपीठावरील पुनरागमन झोकात साजरे करणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ चेपॉकच्या घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध वर्चस्वपूर्ण कामगिरी दाखवण्यासाठी उत्सुक आहे.

दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये परतणारा चेन्नईचा संघ मे २०१५नंतर प्रथमच एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर खेळणार आहे. मुंबईविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ड्वेन ब्राव्होच्या अफलातून खेळीमुळे चेन्नईला अनपेक्षितपणे तारले होते. या विजयात पायाच्या दुखापतीवर मात करून मैदानावर परतणाऱ्या केदार जाधवची भूमिकासुद्धा महत्त्वपूर्ण होती. मात्र, दुखापतीमुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतल्याने चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.  कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाचा फॉर्म चेन्नईसाठी उपयुक्त ठरेल.

कोलकाताने रविवारी बलाढय़ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला पराभूत करून यंदाच्या हंगामाचा शानदार प्रारंभ केला. यात सुनील नरिनने धडाकेबाज अर्धशतक झळकावले होते. याशिवाय दिनेश कार्तिकनेही अप्रतिम फलंदाजीचा प्रत्यय घडवला होता.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.
मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 csk vs kkr