दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडलेल्या आयपीएलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला असला तरीही चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन घडवत दिल्लीने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला आहे. दिल्लीने १७.१ षटकांमध्ये १९६ धावा केल्या. मात्र पावसाचा व्यत्यय आल्याने राजस्थानसाठीच्या डावाची षटके कमी करण्यात आली आहेत. राजस्थान रॉयल्सच्या संघाला १२ षटकांत १५१ धावांचे आव्हान देण्यात आले होते. मात्र दिल्लीच्या भेदक गोलंदाजीपुढे राजस्थानचे पाच गडी तंबूत परतले आणि १२ षटकात राजस्थानच्या संघाला १४६ धावांपर्यंतच मजल मारता आली.

पराभवांचे सत्र चालू राहिल्यामुळे गौतम गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयसकडे दिल्लीची धुरा सोपवण्यात आली. नेतृत्वाच्या पहिल्याच परीक्षेत श्रेयस उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत त्याने ४० चेंडूंत नाबाद ९३ धावांची खेळी साकारल्यामुळे दिल्लीला ५५ धावांनी दणदणीत विजय साकारता आला. मात्र मंगळवारी रात्री चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात मात्र दिल्लीचा १३ धावांनी पराभव झाला. त्यामुळे पुनरागमनच्या वाटचालीला धक्का बसला आहे.  दिल्लीसाठी श्रेयस आणि ऋषभचा फॉर्म महत्त्वाचा आहे. या दोघांच्या खात्यावर यंदाच्या आयपीएलमध्ये अनुक्रमे ३०६ आणि २५७ धावा जमा आहेत. गोलंदाजीमध्ये दिल्लीची मदार ट्रेंट बोल्टवर असेल.

  • राजस्थानच्या संघाचे चार गडी तंबूत
  • राजस्थानच्या संघाला १२ षटकांत १५१ धावांचे आव्हान
  • दिल्लीचे ६ गडी तंबूत, पावसामुळे खेळ थांबला
  • दिल्लीचा दुसरा गडी माघारी, पृथ्वी शॉ माघारी
  • दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी
  • पृथ्वी शॉचा राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल
  • पृथ्वी शॉ- श्रेयस अय्यर जोडीने दिल्लीचा डाव सावरला
  • पहिल्याच षटकात धवल कुलकर्णीचा दिल्लीला धक्का, कॉलिन मुनरो माघारी
  • १८ षटकांचा सामना होणार, ५ षटकापर्यंत पॉवरप्ले
  • पावसाचा जोर ओसरला, सामनाधिकाऱ्यांनी दोन षटकं कमी केली
  • दिल्लीत अवकाळी पावसाची हजेरी, सामना सुरु होण्यास उशीर
  • राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय