पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या कगिसो रबाडाऐवजी दिल्ली डेअरडेविल्स संघाने, इंग्लंडच्या लियाम प्लंकेटची संघात निवड केली आहे. आतापर्यंत प्लंकेटने इंग्लंडकडून १३ कसोटी, ६५ वन-डे आणि १५ टी-२० सामने खेळले आहेत. मात्र आयपीएलमध्ये खेळण्याची प्लंकेटची ही पहिलीच वेळ असणार आहे. रबाडाने माघार घेतल्यानंतर उपलब्ध खेळाडूंच्या गटातून प्लंकेटची निवड करण्यात आलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकराव्या हंगामासाठी दिल्ली डेअरडेविल्स संघाने राईट टू मॅच कार्ड वापरत रबाडासाठी ४.२ कोटी मोजत त्याला आपल्या संघात कायम राखलं होतं. मात्र आयपीएलच्या अकराव्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच रबाडाला पाठदुखीमुळे माघार घ्यावी लागली होती. नवीन हंगामात दिल्लीचा संघ ८ एप्रिलरोजी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 delhi daredevils replace kagiso rabada with liam plunkett