आयपीएलच्या अकराव्या हंगामात प्ले-ऑफसाठीची शर्यत रंगतदार अवस्थेत आलेली आहे. हैदराबाद आणि चेन्नईचा अपवाद वगळता इतर सर्व संघ तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी झुंजताना दिसत आहेत. कोलकात्याविरुद्ध सामन्यात पराभव पदरी पडल्यामुळे राजस्थानसाठी प्ले-ऑफचा मार्ग आता थोडा खडतर बनला आहे. अशा परिस्थितीमध्येच राजस्थानच्या संघातले दोन महत्वाचे खेळाडू संघाची साथ सोडून मायदेशी परतणार आहेत. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने जोस बटलर आणि बेन स्टोक्स या खेळाडूंना माघारी बोलवलं आहे.

यापुढील सामन्यात राजस्थानच्या संघाने प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये प्रवेश मिळवण्याची किमया साधल्यास, बटलर आणि स्टोक्स हे खेळाडू राजस्थानच्या संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध नसतील. सध्या जोस बटलरचा फॉर्म पाहता, त्याची अनुपस्थिती राजस्थानच्या संघाचा चांगली भोवण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ –

मार्क स्टोनमॅन, अॅलिस्टर कूक, जो रुट (कर्णधार), ड्वीड मलान, बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्ट्रो, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, डॉम बेस, मार्क वुड

Story img Loader