शेन वॉटसनने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने अंतिम सामन्यात सनराईजर्स हैदराबादवर ८ गडी राखून अकराव्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं. हैदराबादने दिलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना वॉटसनने ५७ चेंडुंमध्ये वॉटसनने ११ चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ११७ धावांची खेळी केली. वॉटसनच्या या तुफानी खेळीवर क्रिकेटविश्वातील मान्यवर व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ट्विटरवर सर्वांनी वॉटसनच्या खेळीचं कौतुक करत, चेन्नईचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.

Story img Loader