आयपीएलच्या अकराव्या हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसनने एका अनोख्या विक्रमाची आपल्या नावावर नोंद केली आहे. आयपीएलच्या एकाच हंगामात ७०० पेक्षा जास्त धावा करणारा विल्यमसन पाचवा फलंदाज ठरलेला आहे. चेन्नईविरुद्ध अंतिम सामन्यात खेळत असताना विल्यमसनने हा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हैदराबादच्या या कर्णधाराने अंतिम फेरीत ३६ चेंडूंमध्ये ४७ धावा पटकावल्या. त्याच्या या खेळीमध्ये ५ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतिम फेरीतल्या या आक्रमक खेळीसोबत विल्यमसनने, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल, माईक हसी या खेळाडूंच्या पंक्तीत प्रवेश मिळवला आहे. अंतिम फेरीतली खेळी पकडून केन विल्यमसनने यंदाच्या आयपीएलमध्ये ७३५ धावा केल्या आहेत.