अकराव्या हंगामाची मोठ्या दिमाखात सुरुवात केलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का बसला आहे. मधल्या फळीतला धडाकेबाज फलंदाज आणि कामचलाऊ फिरकीपटू केदार जाधव दुखापतीमुळे स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात केदार जाधवला मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीचा त्रास जाणवू लागला होता. मात्र अशा परिस्थीततही त्याने संयमाने फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवल्यानंतर केदार जाधवला त्याच्या खेळीसाठी सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं. यादरम्यान केदारने आपल्या दुखापतीविषयी संघ प्रशासनाला माहिती दिली होती. यानंतर केदार उरलेला संपूर्ण हंगाम आयपीएल खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालंय. दरम्यान चेन्नई सुपरकिंग्जने केदार जाधवऐवजी संघात कोणाला जागा मिळणार हे अजुन स्पष्ट केलेलं नाहीये.