शुभमन गिलच्या आक्रमक आणि नाबाद ५७ धावांच्या खेळीमुळे आणि दिनेश कार्तिकने त्याला साजेशी साथ दिल्याने काहीसे अशक्य वाटणारे आव्हान पार करत कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपरकिंग्जवर विजय मिळवला आहे. इडन गार्डन्स मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नईला २० षटकांमध्ये १७७ धावांपर्यंत रोखलं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करण्यास सुरूवात झाली तेव्हा कोलकाता संघाचे चार गडी तंबूत परतले. डाव चेन्नईच्या दिशेने झुकतोय असे दिसत असतानाच शुभमन गिलला सूर गवसला. सहा चौकार आणि दोन षटकारांसह ५७ धावांची खेळी करत त्याने कोलकाता नाइट रायडर्सला विजय मिळवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आक्रमक सुरुवात झाल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजीवर अंकुश लावण्यात कोलकात्याचे गोलंदाज यशस्वी ठरले. चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसन या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली होती. मात्र ठराविक अंतराने या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडण्यात कोलकात्याला यश आलं. यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, मात्र  त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनीही आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला मात्र कोलकाता संघाने चेन्नईचे आव्हान पार केले आणि विजय मिळवला. त्यामुळे इडन गार्डन्स मैदानावर पुन्हा एकदा कोरबो लोडबो जितबोचे सूर उमटले.

  • कोलकाता नाइट रायडर्सचा चेन्नई सुपरकिंग्जवर विजय
  • शुभमन गिलच्या आक्रमक खेळीमुळे कोलकात्याचा विजय आवाक्यात
  • कोलकात्याची घसरगुंडी सुरुच, चौथा गडी माघारी
  • रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर नरीन माघारी, कोलकात्याला तिसरा धक्का
  • सुनील नरेनची फटकेबाजी, कोलकात्याने ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • कोलकात्याचा दुसरा गडी माघारी, चेन्नईची आक्रमक सुरुवात
  • रॉबिन उथप्पा माघारी, आसिफच्या गोलंदाजीवर झेलबाद
  • एन्गिडीच्या गोलंदाजीवर ख्रिस लीन माघारी, कोलकात्याचा पहिला गडी माघारी
  • कोलकात्याची अडखळती सुरुवात
  • कोलकात्याला विजयासाठी १७८ धावांची गरज
  • २० षटकांत चेन्नईची १७७ धावांपर्यंत मजल
  • धोनी – जडेजा जोडीची फटकेबाजी, चेन्नईची आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल
  • रायडू – धोनीची जोडी सुनील नरीनने फोडली, चेन्नईचा चौथा गडी माघारी
  • लागोपाठ सुरेश रैना कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर माघारी, चेन्नईला तिसरा धक्का
  • मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नांत शेन वॉटसन माघारी, चेन्नईला दुसरा धक्का
  • शेन वॉटसन – सुरेश रैना जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • पियुष चावलाने उडवला डु प्लेसिसचा त्रिफळा, चेन्नईचा पहिला गडी माघारी
  • दोन्ही फलंदाजांकडून कोलकात्याच्या गोलंदाजांवर हल्लाबोल
  • शेन वॉटसन – फाफ डु प्लेसिस जोडीची धडाकेबाज सुरुवात
  • कोलकात्याने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय