अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबाद संघाने कोलकाता नाईट रायडर्सवर १४ धावांनी मात करत आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. राशिद खानची प्रभावी फिरकी आणि अखेरच्या षटकात कार्लोस ब्रेथवेटचा प्रभावी मारा या जोरावर हैदराबादने अकराव्या हंगमाच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. हैदराबादने दिलेल्या १७५ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने आपल्या डावाची आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर ख्रिस लिन आणि सुनिल नरीनने फटकेबाजी करत हैदराबादच्या आक्रमणातली हवाच काढून घेतली. मात्र सुनिल नरीन माघारी परतल्यानंतर कोलकात्याचे इतर फलंदाज प्रभावी खेळ करु शकले नाहीत. त्यातच राशिद खानच्या फिरकीच्या जाळ्यात कोलकात्याचे फलंदाज पटापट अडकत केल्यामुळे महत्वाच्या षटकात सामन्याचं पारडं हैदराबादच्या दिशेने झुकलं. अखेरच्या षटकांमध्ये पियुष चावला, शुभमन गिल आणि शिवम मवी यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा