कोलकाता नाईट रायडर्सने आज दिल्ली डेअरडेव्हिल्सवर मोठया विजयाची नोंद केली. घरच्या मैदानावर खेळताना कोलकाताने दिल्लीचा तब्बल ७१ धावांनी पराभव केला. कोलकाताने दिलेल्या २०१ धावांच्या डोंगराएवढया लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव १२९ धावांवर संपुष्टात आला. नितीश राणा ३५ चेंडूत ५९ धावा, आंद्रे रसेल १२ चेंडूत ४१ धावा आणि रॉबिन उथाप्पा ३५ धावा यांच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर कोलकाताने २०० धावांचा टप्पा गाठला. दिल्लीकडून रिषभ पंत २६ चेंडूत ४३ धावा आणि ग्लेन मॅक्सवेल २२ चेंडूत ४७ धावा यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
हे दोघे खेळपट्टीवर असेपर्यंत दिल्लीच्या विजयाची आशा जिवंत होती. पण हे दोघे बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने दिल्लीचे फलंदाज बाद झाले. पंत आणि मॅक्सवेलने चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरही अपयशी ठरला. त्याने फक्त ८ धावा केल्या. मुंबईविरुद्ध दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला जेसन रॉय अवघ्या १ रन्सवर बाद झाला. त्याला पियुष चावलाने दिनेश कार्तिककरवी यष्टीचीत केले.
कोलकात्याकडून सुनील नरेन आणि कुलदीप यादवने प्रत्येकी तीन आणि अन्य गोलंदाजांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. कोलकात्याच्या विजयाचा पाय रचला तो नितीश राणा आणि आंद्रे रसेलने या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. नितीश राणा ३५ चेंडूत ५९ धावांची अर्धशतकी खेळी करताना पाच चौकार आणि चार षटकार लगावले तसेच रसेलने ४१ धावांच्या वादळी खेळीत सहा षटकार मारले.
सामनावीर – नितीश राणा
लाइव्ह अपडेट्स
विजय शंकरच्या रुपाने दिल्लीला आठवा झटका, सुनील नेरनच्या गोलंदाजीवर पायचीत
दिल्ली डेअर डेव्हिल्सला पाचवा झटका, राहुल तेवातिया झेलबाद
दिल्ली डेअर डेव्हिल्सला चौथा झटका, रिषभ पंत झेलबाद
दिल्ली डेअर डेव्हिल्सला तिसरा झटका, गौतम गंभीर बाद
दिल्ली डेअर डेव्हिल्सला दुसरा झटका, श्रेयस अय्यर झेलबाद
दिल्ली डेअर डेव्हिल्सला पहिला झटका, जॅसन रॉय आऊट
दिल्लीला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका
दिल्लीची फलंदाजी सुरु
दिल्लीपुढे विजयासाठी २०१ धावांचे आव्हान
केकेआरचे दोन गडी तातडीने तंबूत
केकेआरच्या १९ षटकांमध्ये १९९ धावा
केकेआरला सहावा झटका, नितीश राणा झेलबाद
केकेआरला पाचवा झटका आंद्रे रसेल बाद
नितीश राणाचे अर्धशतक पूर्ण
रसेलच्या ११ चेंडूत ४१ धावा
आंद्रे रसेलची तडाखेबाज खेळी
केकेआरला चौथा झटका दिनेश कार्तिक झेलबाद
११.४ षटकात चेन्नईच्या १०१ धावा
केकेआरला तिसरा झटका ख्रिस लिन झेलबाद
केकेआरच्या १० षटकांत ८५ धावा
ख्रिस लिन आणि नितीश राणा मैदानावर
धडाकेबाज खेळी करणारा रॉबिन उथप्पा झेलबाद
रॉबिन उथप्पाचे १२ चेंडूत २२ रन्स
ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा मैदानावर
सुनील नारायण झेलबाद
नाणेफेक जिंकून दिल्लीचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय