आयपीएलच्या अकराव्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची गाडी पुन्हा घसरली आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर, पंजाबच्या मालकीणबाई प्रिती झिंटा काहीशी निराश झालेली पहायला मिळाली. आपल्या संघाची गाडी पुन्हा एकदा रुळावर यावी यासाठी प्रिती झिंटाने बाप्पाला साकडं घातलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – IPL 2018 – तुमच्यासाठी कायपण! आयपीएल जिंकण्यासाठी प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना खास ऑफर

इंदूरमधील प्रसिद्ध खजराना गणेश मंदिरात जाऊन प्रितीने संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी गणपती बाप्पाला साकडं घातलं. यावेळी आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी प्रितीने खास तयारी केलेली पहायला मिळाली. आपला चेहरा प्रितीने ओढणीने झाकून घेतला होता. मात्र दर्शन घेत असताना प्रितीच्या चेहऱ्यावरची ओढणी सरकल्यामुळे इतर भाविकांना दर्शन घेणारी व्यक्ती प्रिती झिंटा असल्याचं लक्षात आलं. मात्र प्रसंगावधान राखत प्रितीने आपल्या चाहत्यांना व्हिडीओ किंवा फोटोसाठी गर्दी न करण्याचं आवाहन केलं. मात्र काही चाहत्यांनी प्रितीला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलचं. खजराना मंदिराचे पुजारी अशोक भट्ट यांनी प्रितीच्या या गणेश दर्शनाचं सीसीटीव्ही फुटेज फेसबूकवर शेअर केलं आहे.

२०१४ साली आयपीएल स्पर्धेत विजेतेपदाने पंजाबला हुलकावणी दिली होती. मात्र या हंगामाचा अपवाद वगळता किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी सुमारच राहिली होती. मात्र अकराव्या हंगामात सुरुवातीचे काही सामने जिंकत पंजाबने आश्वासक सुरुवात केली. मात्र गेल्या दोन सामन्यांमध्ये हैदराबाद आणि मुंबईकडून पंजाबला पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे प्रिती झिंटाला गणपती बाप्पा पावतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.