चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आपल्या आक्रमक खेळासोबत, संघातील खेळाडूंना खडतर प्रसंगांमध्ये पाठींबा देण्यासाठी ओळखला जातो. धोनीच्या याच नेतृत्वगुणांमुळे चेन्नईच्या संघाने यंदाच्या हंगामातली आयपीएलच्या प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये धडक मारली आहे. चेन्नईचा जलदगती गोलंदाज लुंगिसानी एन्गिडीनेही कठीण प्रसंगात आपल्यापाठीमागे उभं राहिल्याबद्दल धोनीचे आभार मानले आहेत.

अवश्य वाचा – IPL 2018: धोनीमुळे माझी फलंदाजी बहरली – शेन वॉटसन

मागच्या महिन्यात एन्गिडीच्या वडिलांचं निधन झालं. या घटनेनंतर आयपीएलमध्ये सहभागी व्हावं की नाही याबद्दल एन्गिडी साशंक होता. मात्र धोनीने मला या प्रसंगामध्ये मदत करत मला धीर दिला. त्याने माझी समजूत काढून पुढचा विचार करण्याचा सल्ला दिला, यामुळे आयपीएलमध्येही मी चांगली कामगिरी करु शकलो. पंजाबविरुद्ध सामना जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एन्गिडीने पत्रकारांशी संवाद साधला.

अवश्य वाचा – IPL 2018: हैदराबाद-चेन्नई सामना रद्द झाल्यास ‘या’ संघाला मिळणार थेट फायनलचे तिकीट

आयपीएलच्या मध्यावर असताना एन्गिडीला आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी समजली. यानंतर एन्गिडी दक्षिण आफ्रिकेला जाऊन आपली कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करुन पुन्हा भारतात परतला. यानंतरच्या सामन्यांमध्ये एन्गिडीने आपल्या तेजतर्रार माऱ्याने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांची भंबेरी उडवली. पंजाबविरुद्ध सामन्यात ख्रिस गेलची घेतलेली विकेट, लोकेश राहुलचा उडवलेला त्रिफळा हे त्याच्या अव्वल कामगिरीची उदाहरणं आहे. “ज्या प्रकारे महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नईच्या संघातील इतर खेळाडूंनी मला वडिलांच्या निधनानंतर उभं राहण्यासाठी मदत केली, त्यामुळेच मी चांगली कामगिरी करु शकलो”, असं म्हणत एन्गिडीने धोनीचे आभार मानले.

Story img Loader