हैदराबादने दिलेलं ११९ धावांचं माफक लक्ष्य घेवून मैदानात उतरलेला मुंबईचा अख्खा संघ अवघ्या ८७ धावांमध्येच गारद झाला. त्यामुळे घरच्या मैदानावर मुंबईच्या संघाला ३१ धावांनी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. सूर्यकुमार यादव आणि कृणाल पांड्या वगळता मुंबईच्या इतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. सूर्यकुमारने ३४ धावा केल्या तर कृणाल पांड्याने २४ धावांचं योगदान दिलं. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने सर्वाधिक तीन गडी बाद केले. राशिद खान आणि बासिल थंपी यांनी प्रत्येकी २ गडी बाद करुन मुंबईचा डाव लवकर गुंडाळण्यात हातभार लावला. शाकिब-अल-हसन, मोहम्मद नबी आणि संदीप शर्मा यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा