सवाई मानसिंग स्टेडियमवर पाच वर्षांनी लढत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सनरायजर्स हैदराबादकडून पहिल्याच सामन्यात झालेल्या पराभवाचे दु:ख बाजूला सारून राजस्थान रॉयल्स संघ बुधवारी घरच्या प्रेक्षकांसमोर विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर पाच वर्षांनी होत असलेल्या या लढतीत यजमान राजस्थानसमोर दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान आहे. दिल्लीलाही पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे तेही विजयासाठी जोरदार प्रयत्न करतील.

किंग्ज इलेव्हन पंजाबने लोकेश राहूलच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीला ६ विकेट राखून पराभूत केले होते, तर हैदराबादने अप्रतिम गोलंदाजी व शिखर धवनच्या फलंदाजीच्या बळावर राजस्थानवर ९ विकेट राखून मात केली. स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थित राजस्थान संघाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या रहाणेने पहिल्या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली नाही. संजू सॅमसनच्या ४९ धावा वगळता एकाही फलंदाजाला हैदराबादच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. दुसरीकडे राहुल व करुण नायरने दिल्लीच्या गोलंदाजांना पळता भुई थोडी केली होती. जयपूर मधील हवामान काहीसे ढगाळ असून पावसाची शक्यता या सामन्यात वर्तवण्यात येत आहे.

  • वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.