आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमच्या गोलंदाजांनी केलेली भेदक गोलंदाजी  जबरदस्त फिल्डिंग याच्या जोरावर मुंबईचा १४ धावांनी पराभव केला आहे. मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या दोन्ही संघांचा सामना चांगलाच रंगला होता. सुरुवातीला बॅटिंग करत बंगळुरुच्या संघाने मुंबईसमोर विजयासाठी १६८ धावांचे आव्हान केले होते. मात्र हे आव्हान मुंबईला पार करता आले नाही आणि त्यांचा पराभव झाला.

अखेरच्या षटकात बंगळुरुच्या कॉलिन डी ग्रँडहोमने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर, घरच्या मैदानात खेळताना विराट कोहलीच्या संघाने मुंबईसमोर विजयासाठी १६८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्याआधी मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत बंगळुरुच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. काही ठराविक अपवाद वगळता एकही फलंदाज मोठी भागीदारी रचू शकला नाही. त्यामुळे एका क्षणी १५० पर्यंत मजल मारु शकेल असं वाटणारा बंगळुरुचा संघ ग्रँडहोमच्या फटकेबाजीने १६५ च्या घरात पोहचला.

मुंबईकडून हार्दिक पांड्याने ३ बळी घेतले. त्याला मिचेल मॅक्लेनघन, जसप्रीत बुमराह आणि मयांक मार्कंडे यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये बंगळुरुच्या गोलंदाजांची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळताना आज विराटसेनेचे गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • मुंबईला सातवा धक्का, हार्दिक पांड्या झेलबाद
  • मुंबईला सहावा धक्का, कृणाल पंड्या झेलबाद
  • ड्युमिनी रनआऊट , मुंबईला पाचवा धक्का
  • मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पोलार्ड माघारी, मुंबईला चौथा धक्का
  • कायरन पोलार्ड – जेपी ड्युमिनीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • लागोपाठ मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा माघारी, मुंबईला तिसरा धक्का
  • ठराविक अंतराने सूर्यकुमार यादव पायचीत, मुंबईचा दुसरा गडी माघारी
  • टीम साऊदीने उडवला त्रिफळा, मुंबईचा पहिला गडी माघारी
  • मुंबईच्या डावाची अडखळती सुरुवात, इशान किशन भोपळाही न फोडता माघारी
  • मुंबईला विजयासाठी १६८ धावांचं आव्हान
  • २० षटकांत बंगळुरुची १६७ धावांपर्यंत मजल, अखेरच्या षटकात कॉलिन डी ग्रँडहोमची फटकेबाजी
  • बंगळुरुचे सात गडी माघारी, अखेरच्या षटकांत बंगळुरुच्या फलंदाजांची हाराकिरी
  • मनदीप सिंह, विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर, टीम साऊदी माघारी
  • ठराविक अंतराने बंगळुरुचे फलंदाज माघारी परतण्यास सुरुवात
  • ब्रँडन मॅक्युलम धावबाद, बंगळुरुचा तिसरा गडी माघारी
  • मयांक मार्कंडेच्या गोलंदाजीवर मनन व्होरा माघारी, बंगळुरुचा दुसरा गडी माघारी
  • मनन व्होरा – ब्रँडन मॅक्युलम जोडीकडून बंगळुरुचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • बंगळुरुने ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • मिचेल मॅक्लेनघनच्या गोलंदाजीवर क्विंटन डी-कॉक माघारी, बंगळुरुला पहिला धक्का
  • दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी
  • क्विंटन डी-कॉक आणि मनन व्होरा जोडीकडून डावाची आक्रमक सुरुवात
  • मुंबईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

Story img Loader