एबी डिव्हीलियर्स, मोईन अली आणि कॉलिन डी-ग्रँडहोम यांनी मधल्या फळीत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने, घरच्या मैदानावर खेळताना हैदराबादसमोर विजयासाठी २१८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनच्या चांगलाच अंगलट आला. सलामीवीर पार्थिव पटेल व विराट कोहलीला झटपट माघारी धाडण्यात यशस्वी ठरलेले हैदराबादचे गोलंदाज नंतर सपशेल अपयशी ठरले. डिव्हीलियर्स – मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन बंगळुरुच्या डावाला आकार दिला. दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. डिव्हीलियर्स – मोईन अली माघारी परतल्यानंतर कॉलिन डी ग्रँडहोमने किल्ला लढवत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. हैदराबादकडून राशिद खानने ३ तर सिद्धार्थ कौलने २ फलंदाजांना माघारी घालवलं. संदीप शर्माने एका फलंदाजाला माघारी धाडलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा