जसप्रीत बुमराने टाकलेल्या १७व्या षटकात राजस्थान रॉयल्सचे दोन प्रमुख फलंदाज बाद झाले आणि मुंबई इंडियन्सच्या चमूत विजयाचा जल्लोष सुरू झाला. मात्र, याच बुमराच्या १९व्या षटकात राजस्थानच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करून सामन्याला कलाटणी दिली. अश्यक्य वाटणारे लक्ष्य राजस्थानने ३ विकेट राखून पार केले. के. गौथमने (३३) चतुर खेळ करत राजस्थानचा विजय निश्चित केला.

सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारित २० षटकांत ७ बाद १६७ धावा केल्या. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इव्हीन लेवीसला भोपळाही फोडू न देता धवल कुलकर्णीने त्रिफळाचीत केले. त्यानंतर यादव व किशन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. ही जोडी संघाला मोठी धावसंख्या गाठून देतील असे वाटत असताना कुलकर्णीने किशनला बाद केले. किशनने ४२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार खेचत ५८ धावा केल्या. त्यापाठोपाठ यादवही जयदेव उनाडकतच्या गोलंदाजीवर बाद झाला. यादवने ४७ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७२ धावा केल्या. अखेरच्या पाच षटकांत मुंबईला केवळ ३२ धावाच जोडता आल्या. अजिंक्य रहाणेच्या फेकीवर रोहित शर्मा शुन्यावर धावबाद झाला. किरॉन पोलार्डने २० चेंडूंत १ षटकार व १ चौकार लगावत नाबाद २१ धावा केली.

प्रत्युत्तरात २ बाद ३८ अशा निराशाजनक सुरुवातीनंतरही राजस्थानने कडवी टक्कर दिली. संजू सॅमसन आणि बेन स्टोक्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावा जोडताना संघाला विजयपथावर आणले. २७ चेंडूंत ४० धावा करणाऱ्या स्टोक्सला हार्दिक पंडय़ाने त्रिफळाचीत केले. स्टोक्सने ३ चौकार आणि एक षटकार लगावला. सॅमसनने ३९ चेंडूंत ४ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराच्या एका षटकात सॅम्सन आणि जोस बटलर बाद झाल्याने मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. बुमराने १७व्या षटकात एक धाव देत दोन बळी टिपले. मात्र, बुमराच्या १९व्या षटकात १८ धावा चोपल्या.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स : ७ बाद १६७ (सुर्यकुमार यादव ७२, इशान किशन ५८, किरॉन पोलार्ड नाबाद २१; जोफ्रा आर्चर ३/२२, धवल कुलकर्णी २/३२) वि. राजस्थान रॉयल्स :  (संजू सॅमसन ५२, बेन स्टोक्स ४०, के. गौथम नाबाद ३३; जसप्रीत बुमरा २/२८, हार्दिक पंडय़ा २/३१)

थरारक लढतीत मुंबई इंडियन्सवर ३ विकेट राखून मात

 

  • मात्र मिचेल मॅक्लेनघनच्या गोलंदाजीवर रहाणे माघारी, राजस्थानला दुसरा धक्का
  • अजिंक्य रहाणे – संजू सॅमसन जोडीकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • राहुल त्रिपाठी कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर माघारी, राजस्थानला पहिला धक्का
  • राजस्थानच्या सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
  • राजस्थानला विजयासाठी १६८ धावांचं आव्हान
  • मुंबईचा डाव १६७ धावांवर रोखण्यात राजस्थानला यश
  • जोफ्रा आर्चर हॅटट्रीकवर, मुंबईला सातवा धक्का
  • मिचेल मॅक्लेनघन त्रिफळाचीत, मुंबईची पडझड सुरुच
  • मुंबईचा सहावा गडी माघारी, राजस्थानचं सामन्यात दमदार पुनरागमन
  • जोफ्रा आर्चरचा मुंबईला आणखी एक धक्का, हार्दिक पांड्या त्रिफळाचीत
  • फटकेबाजी करण्याच्या नादात कृणाल पांड्या माघारी, मुंबईला पाचवा धक्का
  • राजस्थानंच सामन्यात जोरदार पुनरागमन
  • मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा भोपळाही न फोडता धावबाद, मुंबईचा चौथा गडी माघारी
  • ठराविक अंतराने सूर्यकुमार यादव माघारी, मुंबईला तिसरा धक्का
  • धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर जॉस बटलरने घेतला झेल, मुंबईला दुसरा धक्का
  • मुंबईची जमलेली जोडी फुटली, इशान किशन माघारी
  • दरम्यान इशान किशनचं अर्धशतकही पूर्ण
  • दुसऱ्या विकेटसाठी किशन-यादव जोडीत १२९ धावांची भागीदारी
  • मुंबईने गाठला शंभर धावसंख्येचा टप्पा, दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
  • सूर्यकुमार यादवची फटकेबाजी, राजस्थानच्या गोलंदाजीचा समाचार घेत केलं अर्धशतक पूर्ण
  • सूर्यकुमार यादव आणि इशान किशन जोडीने मुंबईचा डाव सावरला
  • पहिल्याच षटकात मुंबईला धक्का, एविन लुईस कुलकर्णीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत
  • राजस्थानच्या संघात धवल कुलकर्णीला स्थान
  • रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

Story img Loader