आयपीएलच्या अकराव्या मोसमात आज हैदराबाद आणि राजस्थान हे दोन संघ एकमेकांमध्ये भिडले. सनरायजर्स हैदराबादचा या सामन्यात अत्यंत सहज विजय झाला. शिखर धवनची आक्रमक खेळी आणि हैदराबादच्या संघानी आधी केलेली गोलंदाजी यामुळे विजय अत्यंत सोपा आणि सहज झाला. वृद्धिमान सहाची विकेट गेल्यावर शिखर धवनने १३ चौकार आणि १ षटकाराची आक्रमक खेळी करत ५७ चेंडूत ७३ धावा काढल्या आणि त्याच्या या आक्रमक आणि झुंजार खेळीमुळे हैदराबादच्या संघाने १२६ धावांचे लक्ष्य अत्यंत सहज गाठले. हैदराबादचा विजय होताच चाहत्यांनी मैदानात एकच जल्लोष केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामन्याच्या सुरुवातीला सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत सार्थ आहे हे हैदराबादच्या गोलंदाजांनी सिद्ध केले आहे. कारण राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक झेलबाद, रनआऊट किंवा क्लिन बोल्ड करत हैदराबादच्या संघातील गोलंदाजांनी आपली कमाल दाखवली आहे. हैदराबाद संघाच्या भेदक माऱ्यापुढे राजस्थान रॉयल्सची अवस्था ९ बाद १२५ धावा अशी झाली.

डी आर्की शॉर्ट ४ धावांवर रनआऊट झाला, त्यानंतर थोड्याच वेळात अजिंक्य रहाणेही १३ धावांवर झेलबाद झाला. बेन स्टोक्स ५ धावांवर झेलबाद झाला. तर राहुल त्रिपाठी १७ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठीनंतर संजू सॅमसनही ४९ धावांवर झेलबाद झाला. त्याच्यानंतर मैदानात आलेला कृष्णप्पा गौतमला भोपळाही फोडता आला नाही. तर जॉस बटलर अवघ्या ६ धावांवर बाद झाला. श्रेयस गोपाल १८ धावांवर झेलबाद झाला तर जयदेव उनाडकट अवघी १ धाव करून रन आऊट झाला. एकट्या संजू सॅमसनचा अपवाद वगळला तर एकालाही ४० च्यावर धावा करता आल्या नाहीत. परिणामी राजस्थानचा संघ फक्त १२५ धावा करू शकला. राजस्थान रॉयल्सने ठेवलेले हे आव्हान शिखरच्या आक्रमक खेळीने अत्यंत सहजरित्या पार केले. त्यामुळे आजच्या सामन्याचा हिरो ठरला तो शिखर धवनच!

 

 

 

लाइव्ह अपडेट्स

शिखर धवनच्या ४७ चेंडूत ७० धावा पूर्ण

पहिल्या विकेटनंतर शिखर धवन आणि केन विल्यम्सन या दोघांनी केलेली पार्टनरशिप महत्त्वाची ठरली

सनरायजर्स हैदराबादच्या १० षटकात ९० धावा पूर्ण

हैदराबादच्या संघाची आक्रमक खेळी, शिखर धवनचे अर्धशतक पूर्ण

सनरायजर्स हैदराबादला मिळाला फ्री हिट

सनरायजर्स हैदराबादचे ५ षटकांमध्ये ४५ रन्स पूर्ण

हैदराबादच्या टीमला पहिला झटका वृद्धिमान साहा आऊट

सनरायजर्स हैदराबादची आक्रमक सुरुवात

राजस्थान रॉयल्सच्या अवघ्या १२५ धावा, हैदराबादपुढे १२६ चे टार्गेट

राजस्थान रॉयल्सच्या ९ बाद १२५ धावा

राजस्थान रॉयल्सला नववा झटका, जयदेव उनाडकट बाद

राजस्थान रॉयल्सला आठवा झटका, श्रेयस गोपाल झेलबाद

राजस्थान रॉयल्सला सातवा झटका, जॉस बटलर आऊट

राजस्थान रॉयल्सला सहावा झटका, कृष्णप्पा गौतम झेलबाद

राजस्थान रॉयल्सला पाचवा झटका, संजू सॅमसनही झेलबाद

राजस्थान रॉयल्सला चौथा झटका, राहुल त्रिपाठी झेलबाद

संजू सॅमसन आणि राहुल त्रिपाठी मैदानावर

राजस्थान रॉयल्सला तिसरा झटका, बेन स्टोक्स झेलबाद

राजस्थान रॉयल्सला दुसरा झटका, अजिंक्य रहाणे झेलबाद

६.२ षटकात राजस्थान रॉयल्सच्या ५१ धावा

राजस्थान रॉयल्सला पहिला झटका, डी आर्की शॉर्ट धावबाद

अजिंक्य रहाणे आणि डी आर्की शॉर्ट मैदानावर फलंदाजीसाठी दाखल

हैदराबाद संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 sunrisers hyderabad vs rajasthan royals