आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्सचा स्टार प्लेयर ग्लेन मॅक्सवेलने साफ निराशा केली. मॅक्सवेलच्या या खराब फॉर्ममागे ऋषभ पंतची दमदार कामगिरी सुद्धा एक कारण आहे असे मत रिकी पाँटिंग यांनी व्यक्त केले. दिल्ली डेअरडेव्हिल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना मॅक्सवेलच्या खराब फॉर्मबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, डेअरडेव्हिल्सच्या सलामीच्या सामन्याच्यावेळी मॅक्सवेल एरॉन फिंचच्या लग्नाला गेला होता. त्यामुळे तो या सामन्यात खेळला नाही.

आम्ही मॅक्सवेलला चौथ्या स्थानावर खेळवणार होतो. पण मॅक्सवेलच्या अनुपस्थितीत आम्ही ऋषभ पंतला संधी दिली. त्या सामन्यात ऋषभने चांगली कामगिरी केली. त्यानंतर प्रत्येक सामन्यात ऋषभ पंतच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. ऋषभचा इतका चांगला खेळ पाहून त्याला जास्त दु:ख झाले. एक प्रकारे ऋषभ पंतमुळे ग्लेन मॅक्सवेल झाकोळला गेला असे पाँटिंगने सांगितले.

खरंतर सलमीच्या सामन्यात पंत पाचव्या स्थानावर खेळला. चौथ्या स्थानावर तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला संधी देण्यात आली होती. त्याने १३ चेंडूत १३ धावा केल्या. मॅक्सवेल संघात परतल्यानंतर त्याने सलामीवीर म्हणून त्याने १७,२ आणि २२ धावा केल्या. चौथ्या नंबरवर त्याने १३ आणि पाच रन्स केल्या. पाचव्या स्थानावर त्याने ४७,२७,४,६ आणि ५ धावा केल्या. एकूणच मॅक्सवेलला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

आयपीएल सुरु होण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ तिरंगी मालिका खेळला. त्यामध्ये मॅक्सवेलने मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यामुळे तो आयपीएल खेळण्यासाठी भारतात आला त्यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये होता. पण ऋषभ पंतच्या दमदार फॉर्मने त्याचा आत्मविश्वास हरवून टाकला.

ऋषभ पंतच्या ६८४ धावा

ऋषभने मुंबईविरोधात अवघ्या ४४ चेंडुत ६४ धावा ठोकल्या. यामध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. आपल्या या खेळीने पंतने एका अनोखा विक्रम आपल्या नावे नोंदवला. पंत आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा बनवणारा यष्टीरक्षक बनला आहे. त्याने कोलकाताचा यष्टीरक्षक रॉबिन उथप्पाचा विक्रम मोडला आहे. पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३८ सामने खेळले आहेत. यामध्ये १२३८ धावा बनवल्यात आहेत. आतापर्यंत त्याने ८ अर्धशतक आणि १ शतक ठोकले आहे. १६२.७१ हा त्याचा स्ट्राईक रेट आहे.पंतने आयपीएल २०१८ मध्ये ६८४ धावा बनवल्या आहेत. ज्या अकराव्या हंगामातील कोणत्याही संघाच्या यष्टिरक्षकापेक्षा जास्त आहेत.

Story img Loader