जवळपास दीड महिन्यापासून सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेचा आज शेवटचा सामना झाला. या सामन्यात चेन्नईने हैदराबादवर ८ गडी राखून विजय मिळवला. चेन्नईने पहिल्या क्वालिफायरमध्येही हैदराबादला पराभूत केले होते. दोनही संघ विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरले, पण चेन्नईला यश आले. चेन्नईला आयपीएलचे विजेतेपद आणि ट्रॉफी तर मिळालीच. पण त्या बरोबरच रोख रक्कमही मिळाली. फक्त विजेत्या संघालाच नव्हे, तर उपविजेत्या संघाला आणि इतर विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरविण्यात आले.

चेन्नई (विजेता संघ) – २० कोटी आणि ट्रॉफी : चेन्नईला आयपीएल स्पर्धा जिंकल्यामुळे २० कोटींचा धनादेश आणि आयपीएलची ट्रॉफी मिळाली. संघाचा कर्णधार धोनी याने धनादेश व ट्रॉफी संघाच्या खेळाडूंच्या आणि व्यवस्थापन टीमच्या वतीने स्वीकारला. याशिवाय, चेन्नईच्या संघाच्या प्रत्येक खेळाडूला सन्मानचिन्ह देण्यात आले.

हैदराबाद (उपविजेता संघ) – १२.५ कोटी : अंतिम फेरीत विजेत्या संघापेक्षा कुठेतरी थोडासा कमी पडल्यामुळे हैदराबाद उपविजेता ठरला. त्यामुळे हैदराबादलादेखील बक्षीस दिले गेले. या स्पर्धेत हैदराबादला १२. ५ कोटी रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून देण्यात आला. संघाचा कर्णधार विल्यमसन याने धनादेश संघाच्या खेळाडूंच्या आणि व्यवस्थापन टीमच्या वतीने स्वीकारला.

केन विल्यमसन (ऑरेंज कॅप) – १० लाख आणि ट्रॉफी : हंगामात सर्वाधिक धावा केल्यामुळे हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याला ऑरेंज कॅप आणि बक्षीस प्रदान करण्यात आले. त्याला १० लाख रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली.

अँड्रू टाय (पर्पल कॅप) – १० लाख आणि ट्रॉफी : हंगामात सर्वाधिक बळी टिपल्यामुळे पंजाबच्या अँड्रू टायला पर्पल कॅप आणि बक्षीस प्रदान करण्यात आले. त्याला १० लाख रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली.

Story img Loader