आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात हैदराबादने बंगळुरूवर पाच धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीचा झेल हा सामन्यातील ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. युसूफ पठाणने एका हातात झेल पकडून विराटला माघारी धाडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या कॅचची चर्चा सोशल मिडीयावर चांगलीच रंगली. हा झेल, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी या कॅचची आणि युसुफची प्रशंसा तर केलीच, पण कित्येकांनी वेगवेगळे इमोजी, GIF इमेजेस वापरून कमेंट केल्या.

असे असले तरी या सगळ्या चर्चेत विशेष ठरले ते युसुफचा भाऊ आणि भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाण याचे ट्विट. विराट ३९ धावांवर असताना युसुफने उडी मारून एका हातात विराटचा झेल घेतला. तो झेल पाहून इरफानने युसुफला ट्विटरवर विचारले, ‘हा झेल होता की तू आंबा तोडला आहेस?’ या ट्विटमध्ये त्याने युसुफलाही टॅग केले.

यावर युसूफनेही त्याला झकासपैकी उत्तर दिले. युसूफ म्हणाला की लहानपणी आपण दोघांनी एकत्र एवढे आंबे तोडले आहेत. ती माझी सवय अजूनही गेलेली नाही आणि त्यातही त्याने इरफानला टॅग केले.

दरम्यान, १४७ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता. त्यावेळी फिरकीपटू साकीब-अल-हसनला ९ व्या षटकात गोलंदाजी देण्यात आली आणि साकिबने कर्णधाराच्या निर्णयाला न्याय देत युसूफ पठाणकरवी विराटला झेलबाद केले. विराटच्या बाद होण्यातून संघ सावरेपर्यंत डिव्हीलियर्सदेखील बाद झाला. हा सामना गमावल्यामुळे बंगळुरूला आता स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवणे अधिकच कठीण झाले आहे.

हा पहा तो झेल –