आयपीएलमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. मात्र या सामन्यात जास्त चर्चा झाली ती एबी डिव्हीलियर्सने पकडलेल्या ‘सुपर कॅच’ची. मैदानापासून १. १३ मीटर उंच उडी मारून त्याने एका हाताने तो झेल टिपला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्याचे भरभरून कौतूक झाले. आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील हा सर्वोत्तम झेलपैकी एक ठरला. हा झेल पाहून फिल्डिंगचा बादशाह जॉन्टी ऱ्होड्सही अवाक झाला.

बंगळूरूच्या संघाने दिलेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या अॅलेक्स हेल्सने पाय क्रिझ बाहेर काढून मोईन अलीचा चेंडू मैदानाबाहेर टोलवला. हा चेंडू उंचावरून जाताना हा झेल डिव्हीलियर्सने हवेतच अप्रतिमरित्या टिपला. दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूने हवेत उंचावरून चेंडू टोलावल्यानंतर उंच उडी घेत डिव्हीलियर्सने एका हाताने झेल घेतला.

याबाबत जॉन्टी ऱ्होड्सने ट्विट केले की वा! काय झेल टिपलाय.. एक वेडा माणूसच असा झेल झेलू शकतो.

डिव्हीलियर्सचा झेल पाहताना कर्णधार विराट कोहलीचाही डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याच्या या कामगिरीची तुलना ‘सुपरमॅन’शी केली जात आहे. मात्र विराट कोहलीने त्याची तुलना ‘सुपरमॅन’शी न करता ‘स्पायडरमॅन’शी केली आहे. कोहलीने इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर केली. त्यात त्याने असे लिहिले आहे की मी आज स्पायडरमॅन पाहिला. स्पायडरमॅन जसा झटपट हालचाल करतो, तसाच झेल डिव्हीलियर्सने पकडला.

Saw #SpiderMan Live today! @abdevilliers17 #RCBvsSRH #IPL2018

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

याबाबत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनदेखील अवाक झाला. त्याने हा झेलचे वर्णन ‘अविश्वसनीय माणसाने पकडलेला झेल’ जसे केले.

हाच तो ‘सुपर कॅच’ –

Story img Loader