कोलकाता नाईट रायडर्सने आज राजस्थान रॉयल्सला विजयी हॅट्ट्रीक करण्यापासून रोखले. कोलकाताने राजस्थानवर आरामात सात विकेट राखून विजय मिळवला. राजस्थानने विजयासाठी दिलेले १६१ धावांचे लक्ष्य कोलकाताने आरामात पार केले. नितीश राणा (३५) आणि कर्णधार दिनेश कार्तिकच्या (४२) जोडीने कोलकाताच्या विजयावर शिक्कमोर्तब केले.
कोलकाताची सुरुवात खराब झाली होती. डावाच्या प्रारंभीच लिनिनच्या रुपाने त्यांना पहिला धक्का बसला. गाऊथामने भोपळाही फोडू न देता लिनिनला माघारी धाडले. पण त्यानंतर सुनील नरेन (३५) आणि रॉबिन उथाप्पाने (४८) डाव सावरला. हे दोघे बाद झाल्यानंतर राणा आणि कार्तिकने कोलकाताला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून कोलकाताना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचे सलामीवीर अजिंक्य रहाणे (३६) आणि डार्सी शॉर्ट (४४) यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात अजिंक्य रहाणे माघारी परतला. या दोघांचा अपवाद वगळता राजस्थानच्या संघातील अन्य एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. त्यामुळे राजस्थानला १६० धावांवर समाधान मानावं लागलं.
- सुनील नरीन धावबाद, कोलकात्याला दुसरा धक्का
- सुनील नरीन आणि रॉबिन उथप्पा जोडीची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
- कोलकात्याने पार केला ५० धावांचा टप्पा
- मात्र सुनील नरीन आणि रॉबिन उथप्पाने कोलकात्याचा डाव सावरला
- कोलकात्याच्या डावाचीही अडखळती सुरुवात, ख्रिस लिन त्रिफळाचीत, कोलकात्याला पहिला धक्का
- राजस्थानचा डाव १६० धावांवर आटोपला, कोलकात्याला विजयासाठी १६१ धावांचं आव्हान
- धवल कुलकर्णी अखेरच्या षटकात चोरटी धाव घेताना धावबाद, राजस्थानला आठवा धक्का
- अखेरच्या षटकांत जोस बटलरची फटकेबाजी
- लागोपाठच्या चेंडूवर श्रेयस गोपाळ बाद, टॉम कुरनने उडवला गोपाळचा त्रिफळा
- कृष्णप्पा गौतम माघारी, राजस्थानला सहावा धक्का
- राजस्थानच्या डावाची घसरगुंडी, निम्मा संघ तंबूत परतला
- फटकेबाजी करण्याच्या नादात बेन स्टोक्स माघारी
- राहुल त्रिपाठी माघारी, राजस्थानचा चौथा गडी माघारी
- राजस्थानने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा
- नितीश राणाच्या गोलंदाजीवर शॉर्ट माघारी, राजस्थानला तिसरा धक्का
- डार्सी शॉर्टकडून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न
- ठराविक अंतराने राजस्थानला दुसरा धक्का, मोठा फटका खेळण्याच्या नादात संजू सॅमसन माघारी
- राजस्थानला पहिला धक्का, चोरटी धाव घेण्याच्या नादात रहाणे माघारी
- दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी
- कोलकाताच्या फिरकीपटूंवर अजिंक्यचा हल्लाबोल
- अजिंक्य रहाणे – डार्सी शॉर्ट जोडीकडून राजस्थानच्या डावाची सावध सुरुवात
- कोलकात्याने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय