चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी कायम आपल्या संघातील खेळाडूंना टिप्स देताना दिसतो. पण दुसऱ्या कोणत्या संघातील खेळाडू जरी त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी आला, तरी तो तो खेळाडू कधी रिकाम्या हाती परतत नाही. युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणं धोनीला नेहमीच आवडतं. त्याच्याकडून क्रिकेटमधील टिप्स मिळणं, ही युवा खेळाडूसाठी पर्वणीच असते. धोनीकडून अशाच काही टिप्स मिळण्याचे भाग्य लाभलं कोलकाता नाईट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज शिवम मावीला.

चेन्नई आणि कोलकाता या दोन संघांमध्ये दुसरा सामना झाल्यानंतर शिवमने धोनीची भेट घेतली. यावेळी धोनीने शिवमला क्रिकेटच्या टिप्स तर दिल्याच. आणि त्याच्याबरोबर सेल्फीदेखील काढला. धोनीचा हा अंदाज पाहून शिवम एकदम भारावून गेला. त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने थेट धोनीबरोबरचा सेल्फी इंस्टाग्रामवर शेअर केला आणि धोनीचे आभार मानले.

या फोटोखाली आभार मानताना शिवमने लिहिले की माही भाई, तुम्ही मला दिलेल्या टिप्स माझ्यासाठी खूप उपयुक्त आहेत. तुमचं मार्गदर्शन आणि टिप्स मला मिळाल्या हे माझे भाग्यच आहे. तुमची चिकाटी, सचोटी, मनमिळाऊ अंदाज मला नेहमीच प्रेरित करत राहील. भविष्यात अजून खूप गोष्टी तुमच्याकडून शिकायला मला आवडतील. माझ्यातील सुप्त गुण तुम्ही जाणलेत आणि मला त्याची जाणीव करून दिलीत. त्याच्यासाठी मनापासून आभार!

याशिवाय, शिवम मावी, कुलदीप यादव, पियुष चावला आणि रिंकू सिंग या चार कोलकात्याच्या खेळाडूंनी चेन्नईच्या सुरेश रैनासोबतही फोटो काढला. हा फोटो रैनाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्या फोटोला ‘बंधुभाव’ असे कॅप्शन दिले आहे.

#brotherhood

A post shared by Suresh Raina (@sureshraina3) on

दरम्यान, या सामन्यात कोलकाताने चेन्नईवर मात केली.

Story img Loader