आयपीएलच्या दहाव्या हंगामाचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातली परिस्थिती काही फारशी चांगली झालेली नाही. प्ले-ऑफची फेरी गाठण्यासाठी मुंबई इंडियन्ससमोरचा रस्ता आता खडतर बनलेला आहे. आपल्या उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला विजय मिळवणं गरजेचं असून, इतर संघाच्या विजयावरही त्यांना अवलंबून रहावं लागणार आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज पाठोपाठ प्रेक्षकांची पसंती असलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. आतापर्यंत ३ वेळा मुंबईच्या संघाने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. Loksatta.Com ने घेतलेल्या Poll मध्ये वाचकांना मुंबई इंडियन्सच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारले असताना, अजुनही बहुतांश लोकांनी मुंबई इंडियन्स प्ले-ऑफच्या सामन्यांसाठी पात्र ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. १९०० पेक्षा जास्त  लोकांनी या Poll वर आपली मत नोंदवली असून, मुंबई प्ले-ऑफच्या सामन्यांत पात्र ठरेल का? या प्रश्नावर तब्बल ३९ टक्के लोकांनी होकार दर्शवला आहे. ४७ टक्के लोकांनी मुंबईच्या विरोधात मत दिलं असलं तरीही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी आशा अजुन सोडलेली दिसत नाहीये.

 

याचसोबत यंदाचा आयपीएल हंगाम कोणता संघ जिंकेल असा प्रश्न विचारला असता, ३९.३ टक्के लोकांनी चेन्नई सुपरकिंग्जला आपली पसंती दर्शवली असून २०.६ टक्के लोकं मुंबईच्या विजयाबद्दल अजुनही आशादायी आहेत. चेन्नईपाठोपाठ हैदराबादच्या संघालाही ३०.१ टक्के मत दिली आहेत.

 

या सामन्यांच्या निकालावर अवलंबून असेल मुंबई इंडियन्सचं भवितव्य –

मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – मुंबईला विजय आवश्यक

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – बंगळुरु जिंकण आवश्यक

सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – हैदराबाद जिंकण आवश्यक

दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – मुंबईला विजय आवश्यक

Story img Loader