भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा आपल्या लांब आणि उंच षटकारांसाठी नेहमीच चर्चेत असतो. अत्यंत दबावाच्या वेळी देखील धोनी षटकार मारून संघाला दिलासा देतो. त्याच्या या उत्तुंग षटकारांमागचे गुपित काय बरं असेल? असा प्रश्न चाहत्यांना नेहमी पडतो.

एका कार्यक्रमात चेन्नई संघातील काही खेळाडू मंचावर बसून चाहत्यांशी दिलखुलास संवाद साधत होते. त्यावेळी एका चाहत्या प्रेक्षकाने हा बहुचर्चित प्रश्न धोनीला विचारलाच. धोनीनेदेखील आपल्या खास शैलीत त्या प्रश्नाचं अफलातून उत्तर दिलं.

चाहत्याने धोनीला विचारले की तू एवढे लांब आणि उंच फटके कसे काय मारतोस? त्यावर धोनीने या मागचे गुपित सांगितले आणि असे उत्तुंग षटकार कसे मारावेत हेदेखील संगीतले. तो म्हणाला, ‘डोळे बंद करा, बॅट उचला, देवाचं नाव घ्या आणि मारा षटकार …’ धोनीच्या या मिश्किल उत्तराने कार्यक्रमात हशा एकच पिकला आणि धोनीने उपस्थितांची मनं जिंकली.

यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीने १० सामन्यात सर्वाधिक २७ षटकार लगावले आहेत. या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचा १०८ मीटर लांब षटकारही धोनीच्याच नावे आहे.

Story img Loader