पावसामुळे वारंवार थांबवावा लागलेला सामना अखेर राजस्थान रॉयल्सने जिंकला आहे. विजयासाठी दिल्लीला सहा ओव्हर्समध्ये ७१ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. मात्र विकेट्स गेल्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स फक्त ६० धावा करु शकला. राजस्थान रॉयल्सने १० धावांनी हा सामना जिंकला. याआधी दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे दोन वर्षांनी राजस्थानमधील सवाई मान सिंह स्टेडिअमवर हा सामना पार पडला. त्यामुळे घरच्या मैदानावर विजयी सुरुवात करण्याचा राजस्थान रॉयल्सचा प्रयत्न होता, ज्यामध्ये त्यांना यश आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजी करत असताना पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. पहिल्या डावातील १७.५ ओव्हर्स झाल्या असतानाच पाऊस आला आणि खेळ थांबवावा लागला. काही वेळानंतर पाऊस थांबल्यानंतर कव्हर्स हटवण्यात आले, मात्र पुन्हा एकदा पाऊस सुरु झाला आणि पुन्हा खेळ थांबवावा लागला. खेळ थांबवण्यात आला तेव्हा राजस्थान रॉयल्सने १५३ धावा केल्या होत्या. राहुल त्रिपाठी १५ आणि कृष्णाप्पा गौतम दोन धावा करत खेळत होता.

पाऊस थांबण्यात बराच वेळ गेल्याने दिल्लीसमोर सहा ओव्हर्समध्ये ७१ धावांचं आव्हान ठेवण्यात आलं. मात्र लागोपाठ गेलेल्या विकेट्समुळे दिल्ली फक्त ६० धावा करु शकला आणि राजस्थानने हा सामना जिंकला.