आयपीएलच्या हंगामात अफगणिस्तानचा फिरकीपटू रशिद खान हैदराबादच्या संघाकडून खेळताना आपल्या फिरकीची जादू दाखवत आहे. हैदराबादला प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. रशिदने त्याच्या गोलंदाजीने आणि विशेषत: गुगली चेंडूने फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे.

त्याचाच प्रत्यय मंगळवारी झालेल्या चेन्नईविरूद्धच्या सामन्यात दिसून आला. हैदराबादच्या संघाने चेन्नईसमोर माफक १४० धावांचे आव्हान ठेवले. मात्र फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर हैदराबादच्या फलंदाजांप्रमाणेच चेन्नईचीही फलंदाजी कोसळली. या डावात सर्वात प्रेक्षणीय ठरला तो रशिद खानने धोनीचा ‘बोल्ड’. फिरकी गोलंदाजी उत्तम प्रकारे खेळू शकणाऱ्या आणि चांगल्या लयीत असणाऱ्या धोनीचा त्रिफळा उडवल्यानंतर रशिदचे सर्वत्र कौतुक झाले.

मात्र, ही किमया त्याने या आधीही करून दाखवली होती. सध्याच्या क्रिकेटमधील एक उत्तम फलंदाज असलेल्या कर्णधार विराट कोहलीलाही रशिदने गुगली चेंडू टाकून त्रिफळाचीत केले होते.

Story img Loader