धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख असलेला रोहीत शर्मा आयपीएलदरम्यान चांगलाच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे रोहीतच्या बॅटवर असलेले स्टीकर. आता असे कोणते स्टीकर आहे की ज्यामुळे त्याच्याबाबत आयपीएलमध्ये बरीच चर्चा होत आहे. तर रोहीतच्या बॅटवर खालच्या बाजूला असलेले स्टीकर क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. आता रोहीतने हे स्टीकर लावण्यामागचे कारण काय असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. तर याचे इंग्लंडचा स्टार फलंदाज म्हणून ओळखला जाणारा केविन पिटरसनने याचे उत्तर दिले आहे.
प्राण्यांच्या शिकारीविरोधातील मोहीमेसाठी रोहीतने हे स्टीकर लावल्याचे पिटरसनने सांगितले आहे. सोशल मीडियाच्या आधारे ट्विट पिटरसनने आपले मत व्यक्त केले आहे. पिटरसनने या मोहिमेबद्दल काही दिवसांपुर्वी हिंदीमध्ये ट्विट केलं होतं. याबद्दल बरीच चर्चाही झाली होती. काही काळापूर्वी रोहीत शर्मा काही हॉलिवूड कलाकारांबरोबर शिकारविरोधी मोहीमेत सहभागी झाला होता. त्यावेळी प्राण्यांच्या नष्ट होणाऱ्या जमातींसाठी त्यांनी जनजागृतीचे काम केले होते. याचबरोबर मी पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स) संस्थेचा सदस्य असल्याने शिकारविरोधी जनजागृती करणे माझी जबाबदारी आहे असेही रोहीतने एका मुलाखतीत सांगितले होते.
https://twitter.com/KP24/status/982635869965189120
जगातील शेवटच्या नर पांढऱ्या ऱ्हिनोचं केनियातील ओल पेजेटा वन्य अभयारण्यात निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्याची प्रकृती खालावलेली होती. त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र अखेर या शेवटच्या नर गेंड्याचा मृत्यू झाला. २००९ साली दोन माद्यांसह त्याला झेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणण्यात आले होते. हा गेंडा SORAI चा सिंबॉल आहे. याचा अर्थ सेव्ह अवर राइनो आफ्रिका इंडिया म्हणजेच गेंडा वाचविण्याची मोहिम.