दिल्ली डेअरडेव्हिल्सने शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर शानदार विजय मिळवला. पण या संघामध्ये गौतम गंभीर नव्हता. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. तडकाफडकी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद सोडल्यानंतर पुढच्याच सामन्यात गंभीर खेळला नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सामन्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिल्लीचा नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला कि, गंभीरने स्वत:हून संघाबाहेर बसून त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याचा निर्णय घेतला. मी गंभीरला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला नाही. तो त्याचा स्वत:चा निर्णय होता. खरोखरच हा खूप मोठा निर्णय होता. त्याच्याबद्दल मनात असलेला आदर आता आणखी वाढला आहे.

गंभीरच्या जागी कॉलिन मुनरोला संधी देण्यात आली. त्याने १८ चेंडूत ३३ धावा फटकावून दमदार सुरुवात करुन दिली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर खेळणा-या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने कोलकाता नाइट रायडर्सला ५५ धावांनी नमवून पराभवाची मालिका संपवली. दिल्लीकडून खेळणारे मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने २२० धावांचं तगडं आव्हान कोलकात्यासमोर ठेवलं होतं.

पण या आव्हानाचा सामना करताना कोलकात्याचा संघ २० षटकात ९ गडीबाद केवळ १६४ धावाच बनवू शकला. कोलकात्याकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ३० चेंडूत ४४ धावा केल्या. त्या खालोखाल शुभमन गिलने २९ चेंडूत ३७ धावा काढल्या , पण जम बसत आहे असं वाटत असतानाच शुभमन धावबाद झाला. दिल्लीकडून अमित मिश्रा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.