वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचा धाकड फलंदाज क्रिस गेल यावर्षी इंडियन प्रीमियर लीग २०१८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार आहे. आयपीएल सुरू व्हायला अवघे ५ दिवस उरले आहेत. पण याआधीच क्रिस गेल पंजाबच्या रंगात रंगलेला दिसत आहे. त्याने पंजाबी गाण्यांवर भांगडा करायलाही सुरूवात केली आहे.

२०१७ मध्ये क्रिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून आयपील खेळला होता. सध्या क्रिसचा भांगड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भारतात येण्याची त्याची उत्सुकता या भांगड्यातून स्पष्टपणे दिसते. या व्हिडिओमध्ये क्रिस समुद्रात एका बोटीवर पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. क्रिसने भांगड्याचे अनेक स्टेप्स उत्कृष्ट पद्धतीने केले. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, ‘क्रिस गेल भारतात येत आहे. पंजाबी गाण्यावर डान्सही केला.’

वेस्ट इंडीजच्या या खेळाडूचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालिचा व्हायरल होत आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या चाहत्यांना क्रिसचा हा भांगडा फारच आवडलेला दिसत आहे. काहींच्या मते, क्रिस हा मूळ पंजाबी लोकांपेक्षा पंजाबी झाला आहे. तुम्ही ज्या प्रकारे डान्स केला तो फारच सुंदर आहे अशी एका युझरने कमेंट केली.

https://www.instagram.com/p/BhAK53kn-L0/

२ कोटीं रुपयांना प्रिती झिंटाने तिच्या किंग्ज इलेव्हन पंजाब टीमसाठी त्याला विकत घेतले. लिलावात सुरूवातीला क्रिसला कोणीच विकत घेतले नव्हते. मात्र नंतर प्रितीने त्याला विकत घेतले. त्यामुळे क्रिसच्या चाहत्यांना त्याच्याकडून उत्तम खेळाची अपेक्षा आहे. ७ एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. तर पंजाबचा पहिला सामना दिल्ली डेअरडेविल्ससोबत ८ एप्रिलला होणार आहे.