आयपीएलचा १३ व्या हंगामात कोलकाता संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करताना अपयश येत आहे. कोलकाता संघानं पाच सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. मात्र, रसेलच्या बॅटमधून निघणारा षटकार-चौकारांचा पाऊस चाहत्यांना पाहायला मिळत नाही. रसेलच्या वादळी खेळीसाठी चाहते आतुर आहेत. पण, त्याच्याकडून अपेक्षित खेळी झालेली नाही.
आंद्रे रसेलच्या खराब फॉर्मवरुन नेटकऱ्यांनी त्याच्या पत्नीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण रसेलची पत्नी जेसिम लॉरा हिने ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. जेसिम लॉराने आपल्या उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंद झाली आहे.
जेसिम लॉराच्या इंस्टाग्रामवरील एका फोटोवर कमेंट करत आतिफ खान यानं ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यानं लिहिलं की,आंटी कृपया तुम्ही दुबईत जा… रसेल चांगल्या फॉर्मात नाही.” आतिफने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र जेसिमानं त्याला आपल्या शैलील उत्तर देत बोलती बंद केली आहे. जेसिम लॉराने आतिफला उत्तर देताना लिहिले की, रसेल त्याच्या सर्वोत्तम फॉर्मात आहे.
जेसिम लॉरा आयपीएलसाठी रसेलसोबत भारतामध्ये येत असते. पण यंदा करोना विषाणूमुळे तिनं दुबईत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. जेसिम लॉरा आणि आंद्रे रसेल नुकतेच आई-बाबा झाले आहेत.