पंजाब आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम लोकेश राहुलच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधारांनी आपापल्या संघातील बदल सांगितले. पंजाबने ग्लेन मॅक्सवेल, अर्शदीपला संघाबाहेर केलं आणि त्याजागी जेम्स निशम, मयंक अग्रवालला संघात स्थान दिलं. चेन्नईनेदेखील शेन वॉटसनला संघाबाहेर ठेवच फाफ डु प्लेसिसला संघात घेतलं.
नाणेफेकीच्या वेळी धोनीला विचारलेला प्रश्न आणि त्याचं धोनीने दिलेलं उत्तर जास्त चर्चेत राहिलं. नाणेफेक जिंकल्यावर धोनी अँकरशी बोलण्यासाठी पुढे आला. हा चेन्नईचा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना असल्याने अँकर डॅनी मॉरिसनने धोनीला एक प्रश्न विचारला. पिवळ्या जर्सीत म्हणजेच चेन्नईकडून हा तुझा कारकिर्दीतील शेवटचा सामना असू शकतो का? असं धोनीला विचारण्यात आलं. त्यावर क्षणार्धात धोनीने, “नक्कीच नाही. (Definitely Not). हा माझा पिवळ्या जर्सीतील शेवटचा सामना) नक्कीच नसेल”, असं दमदार उत्तर दिलं.
Danny Morrison : Could this be your last game in yellow ? #MSDhoni : Definitely Not!#CSK have won the toss and they will bowl first against #KXIP in Match 53 of #Dream11IPL pic.twitter.com/KhaDJFcApe
— IndianPremierLeague (@IPL) November 1, 2020
धोनीने हे उत्तर दिल्यावर धोनीचे ते विश्वासपूर्वक उच्चारलेले शब्द #DefinitelyNot ट्विटरवर हॅशटॅगसह ट्रेंड होताना दिसले. चेन्नईने स्वत: या दोन शब्दांबद्दल एक ट्विट केलं. आणि त्यानंतर पटापट हे दोन शब्द ट्रेंड होताना दिसले.
Super Fans happy annachi! #DefinitelyNot #WhistlePodu #Yellove #WhistleFromHome #CSKvKXIP pic.twitter.com/NwqoaYmhoW
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 1, 2020
—
Started Trending within minutes
The Craze this Man has #DefinitelyNot #WhistlePodu pic.twitter.com/bDqozExtuB
— Amy(@gueswhoamiii) November 1, 2020
—
#DefinitelyNot This made my day @msdhoni will continue in IPL 2021 @ChennaiIPL pic.twitter.com/RtFQINYMls
— Mueen Séùl (@Mueenseul) November 1, 2020
—
different times, same emotion! #DefinitelyNot pic.twitter.com/mraKYAr1Hu
— Neeche Se Topper (@NeecheSeTopper) November 1, 2020
—
One smile, two words.
MS Dhoni breaks the internet. #IPL2020 | #CSKvKXIP | #DefinitelyNot pic.twitter.com/z6kWpyrXdA
— Wisden India (@WisdenIndia) November 1, 2020
—
#DefinitelyNot
That's it, That's the tweet. pic.twitter.com/H8ArEBDqiX— Whistle Podu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) November 1, 2020
—
From 'Consider me as retired' to '#DefinitelyNot' 2020 has been full of surprises
Love you 7'000 Forever. @MSDhoni #IPL2020 #WhistlePodu
— (@DHONIism) November 1, 2020
दरम्यान, IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाला साखळी फेरीत गाशा गुंडाळावा लागला. या आधीच्या सर्व हंगामांमध्ये चेन्नईने किमान प्ले-ऑफ्स फेरी नक्कीच गाठली होती.