IPL 2020 Playoffs Qualifier 2 DC vs SRH: दिल्ली आणि हैदराबाद या दोन तुल्यबळ संघाच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना म्हणजे उपांत्य फेरीचीच लढत आहे. Playoffs च्या पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या दिल्लीच्या संघाला अंतिम फेरी गाठण्याची ही शेवटची संधी आहे. त्यातच सलग ४ सामने जिंकून हैदराबादचा संघ स्पर्धेत भक्कमपणे उभा आहे. अशा परिस्थितीत मैदानात नाणेफेकीच्याच वेळी श्रेयस अय्यरच्या बाबतीत विचित्र प्रसंग घडला.

नाणेफेकीच्या वेळी सूत्रसंचालन करण्यासाठी मार्क निकोलस मैदानात आले. नाणेफेक जिंकल्यावर श्रेयसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सांगितला. या निर्णयामागे नक्की काय कारण हेदेखील त्याने सांगितलं. त्यानंतर मार्क यांनी श्रेयसला संघात काही बदल आहेत का असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर बोलताना श्रेयसने पृथ्वी शॉ च्या जागी प्रविण दुबेला संघात स्थान दिल्याचं सांगितलं. पण काही केल्या त्याला दुसरा बदलेलला खेळाडूच आठवेना… काही कालावधी नंतर त्याला अचानक आठवलं आणि मग त्याने सॅम्सच्या जागी शिमरॉन हेटमायरला संधी दिल्याचं सांगितलं.

भर मैदानात स्वत:ची अशी फजिती झालेली पाहून श्रेयसला स्वत:वरच हसू आवरलं नाही. त्याने हसत हसत पुढच्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली आणि तो बाजूला झाला.

Story img Loader