लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदा जसप्रीत बुमराहने धडाकेबाज कामगिरी करत मलिंगाची उणीव भासून दिली नाही. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये बुमराहने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. दिल्लीविरुद्ध प्ले-ऑफच्या सामन्यात बुमराहने ४ षटकांत १ षटक निर्धाव टाकत अवघ्या १४ धावा देत ४ बळी घेतले. दिवसेंदिवस बुमराह करत असलेल्या भेदक माऱ्याची भीती फलंदाजांच्या मनात बसायला लागली आहे. सध्याचे क्रिकेटपटूच नव्हे तर माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लारानेही आपल्याला बुमराहचा सामना करणं जमलं नसतं असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – जसप्रीत बुमराह जगातला सर्वोत्तम टी-२० गोलंदाज !

हिंदुस्थान टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत लाराने बुमराहचं कौतु केलं. “एकवेळ मी कपिल देव, जवागल श्रीनाथ आणि मनोज प्रभाकर यांचा सामना करेन…पण जसप्रीत बुमराहचा सामना करणं मी पसंत करणार नाही. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर हे दोन गोलंदाज जर ७० ते ९० किंवा अगदी २००० सालात क्रिकेट खेळत असते तर त्यांचं नाव आज खूप मोठं झालं असतं.” दिल्लीवर मात केल्यानंतर अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या मुंबईचा सामना दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या जोडगोळीने यंदाच्या हंगामात प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले आहेत. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये दोन्ही गोलंदाजांचा सामना करणं फलंदाजांना चांगलंच कठीण जातंय. दिल्लीविरुद्ध प्ले-ऑफच्या सामन्यात तर पहिल्या ३ क्रमांकावरच्या फलंदाजांना शून्यावर माघारी धाडण्यात बोल्ट-बुमराहची जोडी यशस्वी ठरली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात ही जोडी आपल्या लौकिकाला साजेसा मारा करत संघाला पुन्हा एकदा विजय मिळवून देते का याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.