‘करो वा मरो’ची स्थिती असलेल्या सामन्यात पंजाबच्या संघाने चेन्नईविरूद्ध ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली. लुंगी एन्गीडीच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबचे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण मधल्या फळीतील दीपक हुड्डाने धमाकेदार अर्धशतक ठोकले. त्याने नाबाद ६२ धावांची खेळी करत संघाला २० षटकाच सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. तर लुंगी एन्गीडीने शिस्तबद्ध गोलंदाजी करत ३ महत्त्वाचे बळी टिपले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दीपक हुड्डाचं दमदार अर्धशतक

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात केली. कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल अर्धशतकी भागीदारी करण्याच्या नजीक असताना मयंक २६ धावांवर बाद झाला. पंजाबने पहिला बळी गमावल्यानंतर लोकेश राहुल आणि ख्रिस गेल डाव सांभाळतील अशी शक्यता होती. पण राहुल चांगली फलंदाजी करत असताना ३ चौकार आणि १ षटकार २९ धावांवर माघारी परतला.

लुंगी एन्गीडीचे ३ बळी

त्यानंतर पंजाबने ठराविक अंतराने गडी गमावले. ख्रिस गेल १९ चेंडूत १२ धावा काढून बाद झाला. निकोलस पूरन २ धावांवर तंबूत परतला. मनदीप सिंग आणि दीपक हुड्डा जोडीने संघाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच प्रयत्नात मनदीप १४ धावांवर बाद झाला. दीपक हुड्डाने मात्र एक बाजू लावून धरत २६ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा केल्या. चेन्नईकडून लुंगी एन्गीडीने ३ तर शार्दुल ठाकूर, जाडेजा आणि इमरान ताहीरने १-१ बळी टिपला.